हर्षवर्धन भोसलेचा गुणवंत खेळाडू पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:19+5:302021-02-05T07:13:19+5:30
कोल्हापूर : अवचितपीर तालमीचा खेळाडू हर्षवर्धन भोसले याचा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते गुणवंत ...

हर्षवर्धन भोसलेचा गुणवंत खेळाडू पुरस्काराने गौरव
कोल्हापूर : अवचितपीर तालमीचा खेळाडू हर्षवर्धन भोसले याचा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते गुणवंत खेळाडू पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
हर्षवर्धनने मैदानी स्पर्धेत ४०० मीटर हर्डल्स व शंभर मीटर हर्डल्स या प्रकारात दोन राष्ट्रीय विक्रम प्रस्तापित केले आहेत. यासह राज्य, राष्ट्रीय स्तरावरील अनेक मैदानी स्पर्धाही त्याने गाजविल्या आहेत. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जिल्हा क्रीडा कार्यालयाने त्याची गुणवंत खेळाडूसाठी निवड केली होती. त्याला अवचितपीर तालमीचे अध्यक्ष अनिल इंगवले, उपाध्यक्ष निखील जाधव, सचिव वैभव जाधव, रोहीत माने, प्रमोद इंगवले यांचे प्रोत्साहन लाभले.
फोटो : २८०१२०२१-कोल-हर्षवर्धन
आेळी : धावपटू हर्षवर्धन भोसले याचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते गुणवंत खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रभारी विशेष महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.