'हॅरी पॉटर' कोल्हापुरातील परीख पूलावर, व्डिडिओ व्हायरल 

By संदीप आडनाईक | Updated: October 3, 2023 14:02 IST2023-10-03T14:00:27+5:302023-10-03T14:02:08+5:30

कोल्हापूर : कोल्हापूरातील परीख पूलाची अवस्था इतकी वाईट झाली आहे, की याबाबत विडंबनात्मक रील्सही बनवण्यात येत आहेत. कोल्हापूरच्याच व्हिडिओ ...

Harry Potter on Parikh bridge in Kolhapur, video viral | 'हॅरी पॉटर' कोल्हापुरातील परीख पूलावर, व्डिडिओ व्हायरल 

'हॅरी पॉटर' कोल्हापुरातील परीख पूलावर, व्डिडिओ व्हायरल 

कोल्हापूर : कोल्हापूरातील परीख पूलाची अवस्था इतकी वाईट झाली आहे, की याबाबत विडंबनात्मक रील्सही बनवण्यात येत आहेत. कोल्हापूरच्याच व्हिडिओ आणि कंटेन्ट क्रिएटर सुमित पाटील याने तयार केलेल्या हॅरी पॉटर या जगप्रसिध्द पात्रावरचे परीख पूलावरच्या विडंबनात्मक रील्सला सोशल मिडियात तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा फनी व्डिडिओ इतका व्हायरल झालाय की त्यावर कमेंटसचा पाउस पडला आहे. 

हॅरी पॉटरचा मामा त्याला परीख पूलाच्या अलीकडे स्टॅन्डला जाण्यासाठी सोडताना जपून जाण्याचा सल्ला देतो आणि पूलापुढे पोहाचल्यावर फोन करण्यास सांगतो. परीख पूलाजवळ आल्यावर स्टॅन्डवर कसे जायचे विचारताच दाखवणारा तो नवखा आहे का असे विचारतो. वेलकम टू द परीख पूल असे म्हणून ही जादूची गुहा दाखवतो. पूलाखालून दुचाकी, तिचाकी, चारचाकी चालवणे हे कोणाचेपण काम नाही आणि तू कुठली डीमार्टची गाडी घेउन आलायस असा संवाद होतो. 

त्याचा मामा भर पावसात रात्रीचा आला असणार म्हणूनच जपून जा असा सल्ला दिला असेल असे सांगून पूलावर सोडतो. घाबरु नकोस, मी आहे असे सांगून पलीकडे पोहाचल्यावर फोन कर असा सल्ला देतो. 'हॅरी पॉटर ॲन्ड सिक्रेटस ऑफ परीख पूल' अशी कॅप्शन दिलेल्या इन्स्टाग्रामवरील या रील्सला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Web Title: Harry Potter on Parikh bridge in Kolhapur, video viral