शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

Kolhapur: हुंड्यासाठी छळ, प्राध्यापिकेने संपवले जीवन; पतीसह चौघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 13:46 IST

कोडोली : कारखाना खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याकरिता वारंवार छळ केल्याने प्रियांका रणजित पाटील (वय ३१ रा. बाबूपार्क बहिरेवाडी ...

कोडोली : कारखाना खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याकरिता वारंवार छळ केल्याने प्रियांका रणजित पाटील (वय ३१ रा. बाबूपार्क बहिरेवाडी ता. पन्हाळा) या महिलेने मंगळवारी राहत्या घरात बेडरूममधील फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. याबाबतची फिर्याद प्रियांकाचे वडील सुनील वसंतराव पवार, (रा. अहिल्यानगर, कुंडल, ता. पलुस, जि. सांगली) यांनी दिली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कुंडल येथील सुनील पवार यांची मुलगी प्रियांका हिचा विवाह बहिरेवाडी येथील रणजित सुभाष पाटील यांच्याशी २०१७ मध्ये झाला होता. सासरची मंडळी प्रियांकाला माहेरहून कारखाना खरेदीसाठी पैसे आणण्याची वारंवार मागणी करत होते. तिने माहेरून पाच लाख रुपये आणले होते. परंतु, अजून पाच लाख रुपये घेऊन यावे, असा तगादा सासरच्या लोकांनी लावला होता. तिने पैसे आणण्यास नकार दिल्याने शिवीगाळ, मारहाण करून त्रास दिला जात होता. सासरच्या मंडळींच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रियांकाने मंगळवारी आत्महत्या केली.या घटनेची माहिती कुंडल येथील माहेरच्या नातेवाइकांना समजताच त्यांनी कोडोली पोलिसात पती, सासू, सासरे, नणंद, दीर, जाऊ या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याबाबत आग्रह धरला. गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी रात्री उशिरा पती रणजित सुभाष पाटील, सासरे सुभाष हिंदूराव पाटील, सासू शोभा पाटील, दीर विशाल पाटील, जाऊ प्रज्ञा पाटील व नणंद शीतल चव्हाण या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पती, सासू, दीर व जाऊ यांना कोडोली पोलिसांनी अटक केली. पुढील तपास कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस