शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीसाठी शेतकऱ्याची छळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:52 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विहिरीच्या शेतीपंपाकरिता वीजजोडणीसाठी अर्ज करून व पैसे भरून चार वर्षे उलटली ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विहिरीच्या शेतीपंपाकरिता वीजजोडणीसाठी अर्ज करून व पैसे भरून चार वर्षे उलटली तरी कणेरी (ता. करवीर) येथील श्रीकांत राऊ पाटील या शेतकºयाची महावितरणकडून अक्षरश: छळवणूक सुरू आहे. मुंबईत विद्युत लोकपाल यांनी वीज जोडणी देण्यासंदर्भात २६ आॅक्टोबर २०१८ ला आदेश देऊनही महावितरणने त्यावर कार्यवाही केलेली नाही. हे प्रातिनिधिक उदाहरण असून, वीजजोडणीची अनेक प्रकरणे धुळखात पडण्याची शक्यता आहे.कणेरी येथील श्रीकांत राऊ पाटील यांनी आपल्या शेतामध्ये २०१३ मध्ये विहिरीची खुदाई केली आहे. त्यानंतर त्यांनी ३१ आॅगस्ट २०१३ रोजी विहिरीसाठी वीजजोडणी मिळावी, यासाठी ‘महावितरण’च्या कागल उपविभागांतर्गत येणाºया गोकुळ शिरगाव शाखेकडे अर्ज केला. त्याला तब्बल दोन वर्षांनंतर मंजुरी मिळाली. यानंतर १४ सप्टेंबर २०१५ रोजी ३८९६ रुपये कनेक्शनसाठी भरून घेण्यात आले; परंतु त्यांना वीजजोडणी मिळाली नाही. यासंदर्भात त्यांनी २६ मार्च २०१८ रोजी ‘महावितरण’च्या ताराबाई पार्क येथील ग्राहक तक्रार निवारण कक्ष येथे तक्रार अर्ज दिला. यावर सुनावणी होऊन १७ मे रोजी कक्षाचे अध्यक्ष यांनी लवकरात लवकर वीजजोडणी देण्याचे आदेश दिले; मात्र तरीही त्याची अंमलबजावणी झाली नाही. अखेर त्यांनी मुंबई येथे विद्युत लोकपाल आर. डी. संखे यांच्याकडे दाद मागितली. त्यांच्यासमोर झालेल्या सुनावणीवेळी कोल्हापूर महावितरणचे तत्कालीन अतिरिक्त अभियंता संजय पवार यांनी ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी संबंधितांना शेती पंपासाठी वीज जोडणी निश्चितपणे दिली जाईल, असे सांगितले. त्यानुसार विद्युत लोकपालांनी २६ आॅक्टोबर २०१८ ला महावितरणच्या अभियंत्यांनी मान्य केलेल्या तारखेपर्यंत वीज जोडणी द्यावी, तसेच जोपर्यंत वीज जोडणी होत नाही, तोपर्यंत संबंधित शेतकरी भरपाईस पात्र राहील, असे आदेश दिले. यास नऊ महिने उलटले आहेत.महावितरणची अनास्थाएका बाजूला सरकारने सेवा हमी कायदा आणून एक महिन्यात प्रकरणाचा निकाल लावण्याचे निर्देश शासकीय विभागांना दिले आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे; परंतु महावितरण त्याला अपवाद आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. सेवा हमी कायदा सोडाच न्यायालयाचे अधिकार असलेल्या विद्युत लोकपाल व ग्राहक तक्रार निवारण कक्षाच्या आदेशांनाही केराची टोपली महावितरणकडून दाखविली जात असल्याचे चित्र आहे. हे एक प्रातिनिधिक उदाहरण असून, अशी अनेक प्रकरणे प्रलंबित असण्याची शक्यता आहे. यावरून शेतकरी वर्गामध्ये रोष निर्माण झाला आहे.