शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

Har Ghar Tiranga: ये जुनून है... कृष्णा नदीत ९ किलोमीटर पुरातून पोहत फडकविला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 16:07 IST

Har Ghar Tiranga: कृष्णामाई जलतरण मंडळाचा पुढाका, हरिपूर ते उदगावचा प्रवास

कोल्हापूर/ उदगाव : आझादीचा अमृत महोत्सव कृष्णामाई जलतरण मंडळाच्या सदस्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. अमृत महोत्सव निमित्तानेआज १४ ऑगस्ट रोजी आझादीच्या अमृतमहोत्सवी निमित्त हातात तिरंगा ध्वज घेऊन मंडळातील सदस्यांनी  हरिपूर (ता.मिरज )येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमापासून ते उदगाव ता.शिरोळ येथील कृष्णाघाट पर्यत तब्बल ९ किलोमीटरचे अंतर १ तास १० मिनिटांमध्ये महापुरातून साहसी जलप्रवास पूर्ण करण्यात आले. यामध्ये मंडळाच्या २२ जणांचा समावेश होता.

‌उदगाव (ता.शिरोळ) येथील कृष्णमाई जलतरण मंडळातर्फे अनेक विधायक कामे हाती घेतलेली आहेत. कृष्णाघाट वरील स्वच्छता, ब्रिटीश कालीन पुलावरील दगडी बांधकामातील अनावश्यक झाडे तोडणे, पर्यावरण स्वच्छ ठेवणे तसेच असंख्य मुलामुलींना मोफत पोहण्यास शिकवणे तसेच हरिपूर ते उदगाव कृष्णाघाट व कृष्णाघाट उदगाव ते मिरज असा जवळपास २० किलोमीटर अंतराचा साहसी जलप्रवासाच्या स्पर्धा आयोजित करणे इत्यादी उपक्रम राबवून साहसी शालेय मुला मुलींना प्रोत्साहनपर बक्षिसे देवून गौरविणे अशी अनेक कामे केली जात आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा घालून ७०० ते ८०० लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करणे तसेच मे महिन्यामध्ये बालवाडी पासून ते कॉलेजच्या विध्यार्थी साठी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित केली जातात.

तर सद्या ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन देश साजरा करीत आहे. या पार्श्वभूमीवर उदगाव येथील कृष्णमाई जलतरण मंडळानेही ९ किलोमीटर अंतरावर हातात तिरंगा घेऊन पोहत येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी पहाटे या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये राजू कलगुटगी, प्रा.सुनिल बनहट्टी, जयपाल मगदूम, गणेश पाचंगे, नितीन पाटील,तानाजी जाधव,महेश महाडिक, ऋषभ पाटील,विक्रम घाटगे, संतोष चुडाप्पा, कोळेकर अण्णा,बाळासो चौगुले तसेच मंडळाचे अनेक सदस्यांनी पुढाकार घेऊन पोहत तिरंगा फडकवत हरिपूर पासून उदगाव पर्यत आणण्यात आला. हा उपक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी