शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:47 IST

‘जागा झालाय समाज आज, मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं’, ‘ माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’, अशा गीतांचे सादरीकरण करीत शाहिरांनी शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘थाप डफावर मार शाहिरा’ कार्यक्रमात रंगत आणली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात ‘थाप डफावर मार शाहिरा’ रंगलेप्रशिक्षण शिबिराचा समारोप

कोल्हापूर : ‘जागा झालाय समाज आज, मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं’, ‘ माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’, अशा गीतांचे सादरीकरण करीत शाहिरांनी शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘थाप डफावर मार शाहिरा’ कार्यक्रमात रंगत आणली.राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि विद्यापीठातील अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये आयोजित शाहिरी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी हा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर, शाहीर राजू राऊत प्रमुख उपस्थित होते.

सहभागी प्रशिक्षणार्थींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह लोकनायकांना नमन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. गायक राजू नदाफ याने ‘मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून’ हे गीत सादर केले. प्रशिक्षणार्थी महेश सोनुले आणि सहकाऱ्यांनी ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ हे गीत सादर करून शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरीस मुजरा केला.

शाहीर भारती कोळेकर आणि सहकाऱ्यांनी ‘जागा झालाय समाज आज, मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं’ हे, तर शाहीर माधवी काटकर यांनी ‘वीर मर्द झाशी की राणी’ हा पोवाडा सादर केला. यावेळी भेदिक शाहिरी, शिवरायांचा गोंधळ, महाराष्ट्राचे शाहीर आम्ही व जग बदल घालुनी घाव, आदी पोवाड्यांचे सादरीकरण झाले. याप्रसंगी कलावंत, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.

शाहिरी कलेचे मोठे योगदानमहाराष्ट्राला शाहिरीची प्राचीन परंपरा आहे. शाहिरी कला ही मानवी जीवनात रसनिर्मितीचे सामर्थ्य निर्माण करते. प्रबोधनात्मक परंपरेचा वारसा जिवंत ठेवण्यात शाहिरी कलेने मोठे योगदान दिले असून, ही कला जोपासणे ही काळाची गरज असल्याची भावना डॉ. शिर्के यांनी केली.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर