शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Kolhapur: हमालाने परस्पर विकली कांद्याची पोती; चोरट्यास अटक, गुन्ह्यात आणखी दोन साथीदारांचा समावेश

By उद्धव गोडसे | Published: February 01, 2024 4:31 PM

दोन दिवसांची पोलिस कोठडी

कोल्हापूर : राजर्षी शाहू मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करताना परस्पर कांद्याची पोती दुस-याच व्यापाऱ्यांना विकून कांदा चोरी करणाऱ्या हमालास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संजय गणपती लोहार (वय ४५, रा. बांदिवडे, ता. पन्हाळा) असे कांदा चोर हमालाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील २० हजार रुपये किमतीची कांद्याची २० पोती हस्तगत केली. या गुन्ह्यात त्याच्या आणखी दोन साथीदारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मार्केट यार्डमधील कांदा व्यापारी बन्शीलाल अँड सन्स, अनुप रुपमल पोपटाणी आणि दगडू धोंडीराम जानकर यांच्या दुकानात उतरवली जाणारी २० कांद्याची पोती चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत २८ जानेवारीला शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. फिर्यादींकडून माहिती घेतल्यानंतर काही हमालांनीच कांद्याची पोती लांबवली असावित, असा पोलिसांना संशय आला.त्यानुसार संशयित संजय लोहार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. ट्रकमधून पोती उतरवतानाच त्याने मार्केट यार्डातील दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात २० पोती पोहोचवली. या गुन्ह्यात त्याच्या आणखी दोन साथीदारांचा समावेश असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. लोहार गेल्या दहा वर्षांपासून मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करीत आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. सहायक फौजदार संदीप जाधव यांच्यासह कॉन्स्टेबल मिलिंद बांगर, रवी आंबेकर, बाबा ढाकणे, महेश पाटील, विकास चौगुले, लखनसिंग पाटील, शुभम संकपाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस