सीपीआरमध्ये वर्षाला सरासरी दीडशे अ‍ॅन्जिओग्राफी

By Admin | Updated: January 3, 2016 00:49 IST2016-01-03T00:49:26+5:302016-01-03T00:49:26+5:30

सर्वसामान्यांना दिलासा : गरजूंची संख्या वाढण्याची शक्यता

Half an Angiography of the year in CPR | सीपीआरमध्ये वर्षाला सरासरी दीडशे अ‍ॅन्जिओग्राफी

सीपीआरमध्ये वर्षाला सरासरी दीडशे अ‍ॅन्जिओग्राफी

कोल्हापूर : खासगी रुग्णालयांबरोबर आता येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाने (सीपीआर) अ‍ॅन्जिओग्राफीच्या दरात कपात केली आहे. या दरकपातीमुळे सर्वसामान्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. गतवर्षी अ‍ॅन्जिओग्राफीचे प्रमाण सरासरी दीडशे होते. एक जानेवारी २०१६ पासून अ‍ॅन्जिओग्राफीचा दर साडेसहा हजारऐवजी तीन हजार रुपये करण्यात आला आहे.
जिल्ह्याची आरोग्यवाहिनी समजले जाणारे सीपीआर रुग्णालयात तत्कालीन आरोग्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या कारकिर्दीत २००१ला हृदयशस्त्रक्रिया विभाग सुरू झाला. खानविलकर यांच्या काळात सीपीआरचे रुपडे बदलले. मात्र, त्यानंतर अपुरे मनुष्यबळ, प्रशासनाची अनास्था या कारणामुळे पुन्हा २००७-१० ला या काळात विभागाला उतरती कळा आली. अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टीच्या शस्त्रक्रिया मंदावल्या. त्याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला. या प्रश्नांवर शहरातील विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आदींनी मोर्चे, निदर्शने याद्वारे आवाज उठवून प्रशासनाला जाग आणली. सातत्याने हा अ‍ॅन्जिओग्राफी दराचा प्रश्न उचलून धरला. शुक्रवारी (दि.१) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने अ‍ॅन्जिओग्राफी यावर्षीपासून तीन हजार रुपयांत होणार असल्याचे सांगितले. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून महाविद्यालय प्रशासनाची अनास्था, अपुरे मनुष्यबळ व मानसेवी डॉक्टरांचे थकीत मानधन अशा विविध कारणांचा परिणाम हृदयशस्त्रक्रिया विभागाच्या रुग्णसेवेवर झाला. पण, आता अ‍ॅन्जिओग्राफीचे दर कमी केल्याने भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Half an Angiography of the year in CPR