शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

हळदवडेत अनेक कुटुंबे अंधारात : तीन वर्षांपासून वीज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:07 IST

हळदवडे (ता. कागल) येथील वाढीव वस्तीमधील सुमारे पंधरा कुटुंबांना गेल्या तीन वर्षांपासून महावितरण कार्यालयाकडून वीज जोडणी दिली नसल्याने ही कुटुंबे अंधारातच आहेत.

ठळक मुद्देमहावितरण कार्यालयाच्या गलथानपणाचा फटका

मुरगूड : हळदवडे (ता. कागल) येथील वाढीव वस्तीमधील सुमारे पंधरा कुटुंबांना गेल्या तीन वर्षांपासून महावितरण कार्यालयाकडून वीज जोडणी दिली नसल्याने ही कुटुंबे अंधारातच आहेत. वेळोवेळी मुरगूड येथील महावितरण कार्यालयात या नागरिकांनी मागणी करूनही महावितरण याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे या नागरिकांत तीव्र असंतोष पसरला असून आपल्या सर्व कुटुंबीयांसह हे नागरिक महावितरण कार्यालयाच्या दारातच उपोषण करण्याच्या पवित्र्यात आहेत.केंद्र सरकार व राज्य सरकार सर्व लोकांना वीज दिली म्हणून जाहिरात बाजी करत असताना गेल्या तीन वर्षांपासून कागल तालुक्यातील हळदवडे गावातील सुमारे पंधरा कुटुंब आपल्याला वीज मिळावी म्हणून महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांची मनधरणी करत आहे; पण अद्यापपर्यंत या अधिकाºयांनी या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत. येथील हळदवडे मधील वाढीव वस्तीमध्ये सुमारे चार वर्षांपासून मोहन गोपाळ इंदलकर, सुशीला लक्ष्मण भोसले, नामदेव दशरथ बैलकर, संदीप दत्तात्रय बैलकर, नामदेव भिवा भराडे, अस्मिता रंगराव भराडे, विलास शिवाजी भराडे, भैरू पांडुरंग बैलकर, बबन शिवाजी भराडे, जोतिराम गोपाळ पोवार, श्रीकांत जोतिराम भराडे, आदी आपल्या कुटुंबासह राहत आहेत.या नवीन वस्तीच्या ठिकाणी विजेची सोय नाही, त्यामुळे तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने रीतसर महावितरण कार्यालयाकडे याबाबत मागणी केली होती; पण खर्चाचे कारण सांगून महावितरण या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत याबाबत ठराव करून तो महावितरण कार्यालयाला दिला आहे.याशिवाय खासदार, आमदार यांनीही याठिकाणी तत्काळ वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे, पण तरीही महावितरण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.मेणबत्त्या पेटवून प्रशासनाचा निषेध करणारदरम्यान ग्रामपंचायतीने व नागरिकाने आता लोकशाहीने हा प्रश्न सुटत नसला तर आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये सर्व ग्रामस्थ वीज कार्यालयासमोर मेणबत्त्या पेटवून प्रशासनाचा निषेध करणार आहेत.यानंतरही जर हळदवडेकरांच्या मागणीचा विचार झाला नाही तर सर्व नागरिक कुटुंबातील सर्व सदस्यांसह वीज कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. 

गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने हे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत महावितरण कार्यालयाकडे वीज जोडणीबाबत मागणी करत आहे; पण याकडे नको ती कारणे सांगून दुर्लक्ष झाले आहे. आत्ता आम्हाला न्याय मिळवण्यासाठी नाइलाजास्तव आंदोलन करावे लागणार आहे. यानंतर तरी महावितरण कार्यालयाला जाग येते का पाहू.- जयश्री भराडे, सरपंच हळदवडे, ता. कागल

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर