शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

२७ कोटीची फसवणूक: 'मेकर'च्या मुख्य एजंटला मुंबई विमानतळावर ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 13:12 IST

मेकर ॲग्रो इस्टेट कंपनीने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून प्रसिद्धी मिळवली होती. गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांची सुरक्षितता म्हणून अनेक ठिकाणच्या जमिनी लिहून दिल्या.

कोल्हापूर : मेकर ग्रुप इंडिया कंपनीतील २७ कोटी ४५ लाख ४७ हजारांच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य एजंट ज्ञानदेव बाळासाहेब कुरुंदवाडे (रा. चावरे, ता. हातकणंगले) हा कॅनडाला गेला होता. तो ३० सप्टेंबरला भारतात परतल्याने त्याला मुंबई विमानतळावर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.मेकर ॲग्रो इस्टेट कंपनीने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून प्रसिद्धी मिळवली होती. त्यातून अनेक एजंटही जिल्ह्यात नेमले होते. या तयार केले. एजंटांमार्फत अनेक गुंतवणूकदारही त्यात संशयित कुरुंदवाडेनेही जास्त जास्तीत गुंतवणूक करावी, यासाठी सभा, बैठका घेतल्या. गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांची सुरक्षितता म्हणून अनेक ठिकाणच्या जमिनी लिहून दिल्या. यादरम्यान तो तात्पुरता जामीन मिळवून दिल्लीतून कॅनडाला गेला होता.याबाबतची माहिती अर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यांनी पत्रव्यवहार करून त्याची माहिती मिळवली. संशयित ३० सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. त्याला तेथेच अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मुळात मेकर कंपनीकडून ५६ कोटी ४४ लाख ५२ हजारांचा अपहार झाल्याचे फिर्यादी संजय दुर्गे यांनी म्हटले होते. पण प्रत्यक्षात तपासात हा अपहार २७ कोटी ४५ लाख असल्याचे पुढे आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी