कंदलगावात रस्त्यावरच गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST2021-02-16T04:25:01+5:302021-02-16T04:25:01+5:30

कंदलगावातील मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असते. पण या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण करून गटारी बुजविल्या आहेत. त्यामुळे गटारातील सांडपाणी ...

Gutter Ganga on the road in Kandalgaon | कंदलगावात रस्त्यावरच गटारगंगा

कंदलगावात रस्त्यावरच गटारगंगा

कंदलगावातील मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असते. पण या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण करून गटारी बुजविल्या आहेत. त्यामुळे गटारातील सांडपाणी इतरत्र रस्त्यावरच पसरते. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वाहनधारकांनाही या सांडपाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

चौकट :

रस्त्याशेजारी अनेकांनी घराचे बांधकाम चालू केले की, रस्त्याकडील गटारे पहिल्यांदा बुजविली जातात. विशेष म्हणजे याकडे प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याने अतिक्रमणांचे प्रकार वारंवार वाढत आहेत.

कोट :

कंदलगाव ते कणेरी मुख्य रस्त्यावरील गटर्स बुजविल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर पसरते. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले आहे. त्यांनी याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही.

- दशरथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य,

कंदलगाव.फोटो : १५ कंदलगाव रस्ता

कंदलगाव, ता. करवीर येथे मुख्य रस्त्यावर गटारे बुजविल्याने गटारातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते.

Web Title: Gutter Ganga on the road in Kandalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.