शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आजर्‍यात पोलिसांची मोठी कारवाई, १३ लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 17:06 IST

बेकायदेशीर गुटखा वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर आजरा पोलिसांनी वेळवटी फाट्याजवळ सापळा रचला होता. यावेळी पोलिसांनी १३ लाख ३४ हजारांचा गुटखा व ३ लाखांचा टेम्पो जप्त केला.

आजरा : आजरा - आंबोली मार्गावर वेळवट्टी ( ता‌. आजरा ) फाट्यानजीक पोलिसांनी बेकायदेशीर गुटखा वाहतूक प्रकरणी कारवाई करत एकास अटक केली. यावेळी १३ लाख ३४ हजारांचा गुटखा व ३ लाखांचा टेम्पो असा १६ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शितल जनार्दन पाटील ( वय ४६ रा.बांदा, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग ) असे या अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, बेकायदेशीर गुटखा वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर आजरा पोलिसांनी वेळवटी फाट्याजवळ सापळा रचला होता. सावंतवाडीहून टेम्पो येताच त्याला थांबवून पाहणी केली. त्यामध्ये गोवा बनावटीचा गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूचे पॅकेट्स आढळून आले. यावेळी पोलिसांनी १३ लाख ३४ हजारांचा गुटखा व ३ लाखांचा टेम्पो जप्त केला आहे.याबाबतची फिर्याद पो.हे.कॉ पांडुरंग गुरव यांनी आजरा पोलिसात दिली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, सहाय्यक फौजदार बी. एस. कोचरगी, पो.हे.कॉ संदीप म्हसवेकर, पांडुरंग गुरव, संतोष गस्ती, अनिल तराळ, रणजित जाधव, विशाल कांबळे, प्रशांत पाटील यांनी केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे हे करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी