३१ डिसेंबरपर्यंतची गुंठेवारी नियमित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:08+5:302021-01-08T05:14:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे गुंठेवारी नियमित करण्यात येणार आहेत. याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना ...

३१ डिसेंबरपर्यंतची गुंठेवारी नियमित करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे गुंठेवारी नियमित करण्यात येणार आहेत. याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना घरांसाठी होणार आहे.
राज्य शासनाने ऑगस्ट २००१ मध्ये गुंठेवारी नियमितीकरण अधिनियम हा कायदा आणला होता. २००१ पूर्वी झालेल्या गुंठेवारी योजनांना त्याचा लाभ देण्यात आला होता. मात्र, ज्या जमिनी अतिक्रमणाखाली आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. या अधिनियमामुळे काही क्षेत्रांचे नियमितीकरण प्रलंबित असून, नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अंमलबजावणीचा दिनांक वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ज्या ठिकाणी गुंठेवारी योजना झाल्या मात्र त्यांचे नियमितीकरण झाले नाही त्यांना या अधिनियमातील दुरुस्तीचा लाभ घेता येईल. मात्र, पात्रतेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आलेले नाही.
--