रंकाळा उद्यानातील प्रेमी युगुलांची धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 18:44 IST2017-09-16T18:44:15+5:302017-09-16T18:44:19+5:30

कोल्हापूरात रंकाळा पदपथ उद्यानामध्ये वावरणाºया प्रेमी युगुलांची शनिवारी निर्भया पथकाने धरपकड केली. महिला पोलिसांचे पथक उद्यानात येताच अनेक प्रेमी युगुलांसह तरुणांच्या टोळक्यांनी काढता पाय घेतला. महाविद्यालयात जाण्याच्या नावाखाली काही युवक-युवती उद्यानात अश्लील चाळे करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी (दि. १५) सकाळी ही कारवाई झाली.

Guild of lover of Rangala garden | रंकाळा उद्यानातील प्रेमी युगुलांची धरपकड

रंकाळा उद्यानातील प्रेमी युगुलांची धरपकड


कोल्हापूर : रंकाळा पदपथ उद्यानामध्ये वावरणाºया प्रेमी युगुलांची शनिवारी निर्भया पथकाने धरपकड केली. महिला पोलिसांचे पथक उद्यानात येताच अनेक प्रेमी युगुलांसह तरुणांच्या टोळक्यांनी काढता पाय घेतला. महाविद्यालयात जाण्याच्या नावाखाली काही युवक-युवती उद्यानात अश्लील चाळे करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी (दि. १५) सकाळी ही कारवाई झाली.


शहरातील उद्यानांमध्ये सकाळी फिरायला येणाºया नागरिकांची संख्या मोठी आहे. त्याच वेळेत महाविद्यालयाच्या नावाखाली तरुण-तरुणी उद्यानात वेळ घालवीत असल्याने येथे फिरायला येणाºया ज्येष्ठ नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांसमोर अश्लील चाळे करीत भान हरपून बसलेल्या या जोडप्यांना आवर घालणार कोण? अशी परिस्थिती निर्माण झाल्याने काही नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे निनावी फोनद्वारे तक्रारी केल्या. त्यानुसार शुक्रवारी निर्भया पथकाने रंकाळा पदपथ उद्यानात फेरफटका मारला असता दहा ते पंधरा महाविद्यालयीन प्रेमी युगुले आढळून आली.

येथील कट्ट्यावर बसून झाडाच्या आडोशाला अश्लील चाळे करीत असताना पोलिसांनी या युगुलांना रंगेहात पकडले. जागेवरच त्यांची कानउघाडणी करीत त्यांना पिटाळून लावले; तर काहींनी पोलीस आल्याची चाहूल लागताच तेथून धूम ठोकली. त्यांच्या अश्लील कृत्यांमुळे उद्यानाचे पावित्र्य नष्ट होत चालले होते. ‘निर्भया’ पथकाच्या कारवाईने प्रेमी युगुलांना चांगलाच चाप बसला आहे. या कारवाईमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

 

 

Web Title: Guild of lover of Rangala garden