गुडाळ, खिंडी व्हरवडे, आणाजे, कंथेवाडीत दुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:05+5:302021-01-08T05:18:05+5:30

गुडाळ ग्रामपंचायतीमध्ये चार प्रभागांत अकरा जागांसाठी शिवसेनेच्या एका उमेदवारासह २३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. येथे सत्तारूढ आघाडीच्या विरोधात ...

Gudal, Khindi Verwade, Anaje, Kanthewadi | गुडाळ, खिंडी व्हरवडे, आणाजे, कंथेवाडीत दुरंगी लढत

गुडाळ, खिंडी व्हरवडे, आणाजे, कंथेवाडीत दुरंगी लढत

गुडाळ ग्रामपंचायतीमध्ये चार प्रभागांत अकरा जागांसाठी शिवसेनेच्या एका उमेदवारासह २३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. येथे सत्तारूढ आघाडीच्या विरोधात दुसरी आघाडी निर्माण झाली असून दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी आपलीच सत्ता येणार असा दावा केला आहे.

आणाजे ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून येथे प्रभाग क्रमांक दोनमध्ये माजी सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या विरोधात काॅन्ट्रॅक्टर मोहन पाटील यांची काटेरी टक्कर होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे, तर खिंडी व्हरवडे येथे नऊपैकी एक बिनविरोध, आठ जागेसाठी १९ उमेदवार निवडून रिंगणात उतरले आहेत, पण प्रभाग क्रमांक एकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या जागेसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ती जागा बिनविरोध झाली आहे. येथे प्रभाग दोनमध्ये एका जागेसाठी तिरंगी लढत होत आहे.

कंथेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सात जागांसाठी १४ उमेदवार निवडून रिंगणात उतरले असून दुरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Gudal, Khindi Verwade, Anaje, Kanthewadi