शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

वृत्तपत्र विक्रेत्यांकडून पालकमंत्र्यांचा निषेध, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 5:41 PM

वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करुन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवावी यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देवृत्तपत्र विक्रेत्यांकडून पालकमंत्र्यांचा निषेध, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे काढला धडक मोर्चा २७ जानेवारीला पुढील आंदोलनाची दिशा ठरणार

कोल्हापूर : वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करुन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवावी यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

या ठिकाणी पालकमंत्र्यांचा जाहीर निषेध करुन सरकारला धडा शिकविण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. मोर्चातकोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर येथील वृत्तपत्र विक्रेते मोठयासंख्येने सहभागी झाले होते.दुपारी दोनच्या सुमारास महावीर उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा विजय असो, हम सब एक है, कल्याणकारी मंडळाची स्थापना झालीच पाहीजे, हमारी युनियन...हमारी ताकद, अशा घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, असेंब्ली रोड, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, वटेश्वर मंदीर चौकमार्गे कावळा नाका येथील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर नेण्यात आला.

या ठिकाणी ठिय्या आंदोलन करुन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसह सरकारवर सडकून टीका केली. मोर्चासंदर्भात कळवूनही उपस्थित न राहील्याबद्दल पालकमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध करुन येणाºया काळात सरकारला धडा शिकवून असा इशाराही यावेळी देण्यात आला.

पालकमंत्र्यांसह सरकारविरोधात घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.विभागीय रघुनाथ कांबळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आंदोलने करुन निवेदनही देण्यात आले आहे, परंतु या बहिऱ्या सरकारला ऐकू येत नाही. त्यामुळे त्यांचे कान उघडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.सरकारने वेळीच दखल न घेतल्यास वृत्तपत्र विक्रेते धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.सल्लागार शिवगोंडा खोत म्हणाले, वृत्तपत्र विक्रेता आता जागा झाला असून त्यांनी आता पालकमंत्र्यांसह सरकारविरोधात तोंड उघडल्यास काय हालत होइल हे लक्षात घ्या.मोर्चासंदर्भात कळवूनही पालकमंत्री उपस्थित न राहील्याबद्दल त्यांचा निषेध आहे.त्यांच्याकडून काय होईल असे वाटत नाही. त्यामुळे आपल्याला आता २७ जानेवारीला नागपूर येथे होणाºया वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अधिवेशनात आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. आपला आवाजा आमदार-खासदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी आतापासूनच करावी लागेल.आंदोलनात विभागीय उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी (सांगली), कोषाध्यक्ष गोरख भिलारे (पंढरपूर), स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटना जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते, संगघट शंकर चेचर, कोल्हापूर शहर महानगर संघटना अध्यक्ष रवी लाड शिवाजी मगदूम, आप्पा पाटील (कोल्हापूर), प्रशांत जगताप (सांगली), उत्तम चौगुले (सोलापूर) आदींसह वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर