शहरं
Join us  
Trending Stories
1
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
2
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
3
नाराजीचा भूकंप! एकनाथ शिंदे वगळता शिंदेसेनेचे एकही मंत्री कॅबिनेट बैठकीला हजर नाहीत, कारण...
4
'हिंदुत्वा'वरून प्रकाश महाजन यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात; "राजकारणात भूमिका बदलल्या पाहिजेत, पण.."
5
"...तर मी कोणताही प्रश्न न विचारता राजकारणातून निवृत्ती होईन"; प्रशांत किशोरांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
6
Video: शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला आग! अख्खं घर जळून खाक, अभिनेता थोडक्यात बचावला
7
समजा अचानक समोर बिबट्या आलाच तर काय कराल? अशी घ्या खबरदारी
8
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
9
IND vs SA: गौतम गंभीर- शुममन गिल यांच्यात खेळपट्टीवरून मतभेद? मोठ्या पराभवानंतर चर्चांना उधाण!
10
बंगळूर मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी; ई-मेलमध्ये लिहिलेले कारण ऐकून अधिकारीही चक्रावले!
11
Armaan Malik : Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी
12
तिच्या नखरेल अंदाजावरील गंभीरची कमेंट सगळ्यांना खटकली; पण गावसकरांना मात्र पटली! म्हणाले…
13
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
14
Supreme Court: सीबीआयचे तपास अधिकारी बोगस आहेत; सेवेत राहण्यायोग्यच नाहीत: सुप्रीम कोर्ट 
15
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
16
Mumbai: ‘माहे’श्रेणीतील पहिले पाणबुडीरोधक स्वदेशी जहाज येत्या सोमवारी नौदलात!
17
Bihar: शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी, पाटण्यातील गांधी मैदानात रोषणाई, थेट बंगळुरूहून मागवली फुले
18
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
19
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
20
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
Daily Top 2Weekly Top 5

..तर मी स्वतः त्यांना मदत करीन, सतेज पाटील यांचे आव्हान पालकमंत्री आबिटकरांनी स्वीकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:00 IST

सतेज पाटील यांनी आरोग्य विभागातील गैरव्यवहार उघड करण्याची घोषणा 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये १३ विरुद्ध ० असा विक्रमी विजय मिळवण्याचा महायुतीचा संकल्प असल्याचा दावा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. शासकीय विश्रामधामवर विविध विभागांच्या आढावा बैठकीपूर्वी ते बोलत होते.पालकमंत्री आबिटकर म्हणाले सर्व ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षांना एकत्र घेऊनच निवडणूक लढणार आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्यास निवडून आलेल्या उमेदवाराला महायुतीत सामावून घेतले जाईल. जिल्ह्यात १३ विरुद्ध ० असा न भूतो , न भविष्यति असा विजय आम्ही मिळवू.

सतेज यांचे आव्हान स्विकारले..आमदार सतेज पाटील यांनी आरोग्य विभागातील गैरव्यवहार उघड करण्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले, आमदार पाटील यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारतो. गैरव्यवहार बाहेर काढायचे असतील तर मी स्वतः त्यांना मदत करीन.

आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराचे पुरावे उघडे करणार - आमदार सतेज पाटीलकळंबा : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या स्वार्थापोटी जवळ आलेले आता बाजूला गेले आहेत. ज्यांना जवळ केले ते उलटले; पण हिशेब करणार हे नक्की आहे. विरोधकांकडून आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराचा पैसा येत्या पालिका निवडणुकीत वापरला जाईल. त्याची कागदपत्रे योग्य वेळी उघडी करणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. प्रभाग क्रमांक वीस अंतर्गत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी आमदार ऋतुराज पाटील होते.सतेज पाटील म्हणाले, भाजप जती-जातींत भांडणे लावून सोशल मीडियाचा गैरवापर करीत आहे. पक्ष फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत आलेला पक्ष आहे. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मधुकर रामाने, शिवराज पाटील, विजयकुमार कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अरुण पाटील, इंद्रजित बोंद्रे, राहुल माने, धीरज पाटील, कळंबाचे सरपंच सुमन गुरव, व्ही. व्ही. आंबोळे आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Abitkar Accepts Challenge: Will Help Patil Expose Health Department Corruption

Web Summary : Minister Abitkar accepted MLA Satej Patil's challenge to expose corruption in the health department, offering his assistance. Abitkar aims for a clean sweep in upcoming elections, uniting coalition partners and welcoming independent victors. He anticipates a historic win.