‘जीएसटी’मुळे उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 06:53 IST2025-02-26T06:52:58+5:302025-02-26T06:53:58+5:30

व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटीचा परतावा शासनाकडून मिळतो. पण, शेतकऱ्यांकडून वसूल केलेला जीएसटी गंगाजळीला जमा हाेतो.

GST increases production costs by Rs 15,000 per hectare | ‘जीएसटी’मुळे उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार वाढ

‘जीएसटी’मुळे उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार वाढ

- राजाराम लोंढे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बी पेरल्यापासून शेतमाल विक्रीपर्यंत लागणाऱ्या विविध करांनी शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. खते, कीटकनाशके, औजारांसह इतर गोष्टींवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारली जात असल्याने उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार रुपये वाढ झाल्याचे दिसते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही जीएसटीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याची कबुली दिली. 

मग शेतकऱ्यांना परतावा का नाही?
व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटीचा परतावा शासनाकडून मिळतो. पण, शेतकऱ्यांकडून वसूल केलेला जीएसटी गंगाजळीला जमा हाेतो. एकतर शेतकऱ्यांना जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढावे, अन्यथा त्यांना परतावा द्यावा, अशी मागणी होत आहे.

उत्पादन खर्च कमी होऊन आधारभाव मिळाल्याशिवाय शेती किफायतशीर होणे अशक्य आहे. शेती जीएसटीमुक्त करण्यासाठी आगामी काळात लढा उभा करावा लागणार आहे. केंद्र सरकार एका बाजूला आपण शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत, असा आव आणते आणि प्रत्यक्षातील व्यवहार मात्र त्यांना लुबाडणाराच आहे.
डॉ. अजित नवले, राष्ट्रीय सहसचिव, किसान सभा

ट्रॅक्टर स्पेअरपार्ट         २२ ते २८%
कीटनाशके         १८%
तणनाशके         १८%
शेजी औजारे         १२ ते १८%
शेती पंप         १८%
फवारणी पंप         १२ ते १८%
पीव्हीसी पाइप     १२ ते १८%
ठिबक साहित्य     १२%
सेंद्रिय खते     १२%
रासायनिक खते     ५%
डिझेल     ५%

जीएसटीमुळे असा वाढला उत्पादन खर्च, हेक्टरी 
रासायनिक खतांचा खर्च     ५० हजार (५ टक्के जीएसटी) - २,५०० रुपये
कीटक व तणनाशक     ३० हजार (१८ टक्के जीएसटी) - ५,४०० रुपये
द्रव्य खते व टॉनिक     १० हजार (१८ टक्के जीएसटी) - १,८०० रुपये
पीव्हीसी पाइप, ट्रॅक्टर स्पेअरपार्ट, डिझेल आदी     (१२ ते २८ टक्के जीएसटी) - ४,५०० रुपये

Web Title: GST increases production costs by Rs 15,000 per hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी