शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
4
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
5
डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
6
Psycho Killer Poonam: "जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान
7
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
8
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
9
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
10
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
11
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
12
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
13
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
14
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
15
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
16
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
17
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
18
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
19
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
20
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: ‘ग्रोबझ’ने २८० कोटींची फसवणूक केल्याची तक्रार, मग १२ कोटींचे चार्जशीट का?; सर्किट बेंचची विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:30 IST

सुनावणीस तत्कालीन पोलिस अधीक्षक पंडित यांना हजर राहण्याचे आदेश, लोकमतने हे फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले

कोल्हापूर : ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेसकडून जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची २८० कोटींची फसवणूक केली आहे, असे म्हणणे फिर्यादीच्या वकिलांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्यासमोरील सुनावणीत मांडले. याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने मग बारा कोटींचे चार्जशीट का ?, तपास काय केला ?, अशा शब्दांत तपास अधिकाऱ्यांना विचारणा केली.येत्या मंगळवारी होणाऱ्या सुनावणीसाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले. लोकमतने हे फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले आहे.जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२२ अखेर ग्रोबझ ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यातील मुख्य संशयित विश्वास कोळी यांच्या जामीन अर्जासाठी सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. सुनावणीसाठी शाहूपुरी पोलिसातील सर्व तपास अधिकारी हजर होते. यातील काही अधिकारी उपस्थित होते.यावेळी फिर्यादी रघुनाथ खोडके यांच्या वतीने ॲड. जयंत बारदस्कर यांनी ऑनलाइन बाजू मांडताना झालेल्या तपासाची माहिती न्यायालयात मांडली. पोलिसांनी जिल्हा न्यायालयात दिलेल्या माहितीमध्ये ८० कोटींपेक्षा अधिक रक्कम, फसवणुकीची रक्कम २८० कोटी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत प्रत्येक तपासी अधिकारी यांना तुम्ही काय तपास केला ?, असा प्रश्न विचारला. तपास अधिकारी असमाधानी उत्तर देत असताना, न्यायमूर्ती दिघे यांनी अहवाल वाचल्यासारखे सांगू नका. तपास काय केला हे सांगा ? किती जणांना अटक केले, किती आरोपी आहेत, किती जणांची प्रॉपर्टी अटॅच केली, अशी विचारणा केली. तपास समाधानकारक नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.तपास अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याचेही दिसून आल्याचे निरीक्षण नोंदवले. अखेर न्यायमूर्ती दिघे यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मंगळवारी (दि. ९) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश केले. ॲड. बारदस्कर ऑनलाइन, तर त्यांच्यातर्फे ॲड. अहिल्या नलवडे न्यायालयात हजर होत्या. सरकार पक्षातर्फे ॲड. श्रीराम चौधरी हजर होते.

ए. एस. ट्रेडर्सची सुनावणीदरम्यान, ए. एस. ट्रेडर्समधील फसवणुकीबाबत सुद्धा शुक्रवारी सुनावणी होती. मात्र, पुढील तारीख देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Grobaz fraud of 280 crores, charge sheet for 12?

Web Summary : High Court questions police about the Grobaz fraud case discrepancies. Despite a 280 crore fraud claim, the charge sheet is only for 12 crores. Court summons the former Superintendent of Police for explanation.