विक्रमसिंह घाटगे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:20 IST2021-04-14T04:20:56+5:302021-04-14T04:20:56+5:30
येथील शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त येथील त्यांच्या ...

विक्रमसिंह घाटगे यांना अभिवादन
येथील शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त येथील त्यांच्या स्मारक स्थळावरील पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.तसेच शाहू साखर कारखाना रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, कारखान्याच्या संचालिका सुहासिनीदेवी घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर, ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू साखर कारखान्याचे सर्व संचालक, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी .पाटील,उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, दूधगंगा डेअरीचे अध्यक्ष अजितसिंह घाटगे केनवडेकर, उपाध्यक्ष प्रमोद कदम, शाहू कृषी संघाचे अध्यक्ष अनंत फर्नांडिस, उपाध्यक्ष अरुण शिंत्रे उपस्थित होते.
स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज शाहू साखर कारखान्याच्या रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ केला.
१३ घाटगे
कागल येथे विक्रमसिंह घाटगे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करताना कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, सुहासिनीदेवी घाटगे, वीरकुमार पाटील, अमरसिंह घोरपडे, जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.