आजऱ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:13+5:302021-01-24T04:11:13+5:30
आजऱ्यात हिंदू-मुस्लिम बांधव एकोप्याने व सलोख्याने राहत आहेत. हीच ऐक्याची परंपरा महाराष्ट्रात नव्हे, तर अखंड देशात एकत्रितपणे राहिली पाहिजे, ...

आजऱ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
आजऱ्यात हिंदू-मुस्लिम बांधव एकोप्याने व सलोख्याने राहत आहेत. हीच ऐक्याची परंपरा महाराष्ट्रात नव्हे, तर अखंड देशात एकत्रितपणे राहिली पाहिजे, अशी भूमिका यावेळी मुस्लिम बांधवांनी मांडली. फोटोपूजन व अभिवादन कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र सावंत, युवराज पोवार, शहरप्रमुख ओंकार माद्याळकर, विजय थोरवत, युवासेनेचे महेश पाटील, दिनेश कांबळे, आलम नाईकवाडे, अमानुल्ला आगलावे, इब्राहिम दरवाजवर, सुनील पाटील यासह शिवसैनिक उपस्थित होते.
भादवण ग्रामपंचायतीमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती फोटोपूजन व अभिवादन करून साजरी करण्यात आली. सरपंच संजय पाटील, उपसरपंच दयानंद पाटील, सदस्या छाया देसाई, बेबीताई लोहार, सविता जाधव, कृषी सहायक अनिल कांबळे, बाळासाहेब शिंत्रे यासह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन- आजऱ्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादनप्रसंगी शिवसैनिक.