गडहिंग्लज तालुक्यात राजामाता जिजाऊ व विवेकानंद यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST2021-01-13T05:05:07+5:302021-01-13T05:05:07+5:30
* घाळी महाविद्यालय, गडहिंग्लज गडहिंग्लज : शहरातील घाळी महाविद्यालयात प्राचार्य मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी ग्रंथालयास ...

गडहिंग्लज तालुक्यात राजामाता जिजाऊ व विवेकानंद यांना अभिवादन
*
घाळी महाविद्यालय, गडहिंग्लज
गडहिंग्लज : शहरातील घाळी महाविद्यालयात प्राचार्य मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी ग्रंथालयास २७ ग्रंथ भेट देण्यात आले. पूजा बंदी, अनुजा पाटील, प्रतिभा मोदर, रूबिना मुल्ला या विद्यार्थिनींना ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
----------------------------------
* रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय
गडहिंग्लज : शहरातील रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रा. सुभाष कोरे व स्वाती क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी विजयकुमार चौगुले, आशपाक मकानदार, गुरूलिंग खंदारे, अश्विनी पाटील, चिदानंद कानडे, संतोष देसाई, शिवानी पेडणेकर आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
---------------------------------
* जागृती बी.एड्, गडहिंग्लज
गडहिंग्लज : येथील जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रा. शंकर मगदूम यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे, संगीता जाधव, अनिल दड्डी उपस्थित होते. आर. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. एम. नवले यांनी आभार मानले.
---------------------------------
* शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज
गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात संस्था सचिव प्रा. अनिल कुराडे व प्राचार्या बीनादेवी कुराडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी प्राचार्य एस. एम. कदम, तानाजी चौगुले, परमजीत सिंग, महेश चंद, संतोष शहापूरकर, संदीप कुराडे, प्रज्ञा कुराडे, यु. बी. पाटील आदी उपस्थित होते.
---------------------------------
गडहिंग्लज हायस्कूल, गडहिंग्लज
गडहिंग्लज : शहरातील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक एस. एन. देसाई व दयानंद पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. अमिषा भोसले, तेजस्विनी बिलावर, सी. व्ही. महाजन, एस. पी. पाटील, व्ही. डी. काशिद, व्ही. आर. पालेकर यांनी मनोगत व्यक्त केले. एम. जी. कुलकर्णी, संतोष चौगुले, राजेंद्र मांडेकर, व्ही. डी. काशिद आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
---------------------------------
* कौलगे व खणदाळमध्ये अभिवादन
नूल : कौलगे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापिका शाफिया इनामदार तर खणदाळमध्ये मुख्याध्यापक एकनाथ देसाई यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------------------------
* यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरूवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अनिल गवळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे शिवराज महाविद्यालयात राजामाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन अनिल कुराडे व बीणादेवी कुराडे यांच्या हस्ते झाले. यावेळी एस. एम. कदम, तानाजी चौगुले, परमजीत सिंग, महेश चंद, संतोष शहापूरकर आदी उपस्थित होते.
क्रमांक : १२०१२०२१-गड-०७