सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन; बिंदू चौकात कॅन्डल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:59+5:302021-01-18T04:21:59+5:30
कोल्हापूर : बेळगाव, निपाणी, कारवार, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की जय, ...

सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन; बिंदू चौकात कॅन्डल मार्च
कोल्हापूर : बेळगाव, निपाणी, कारवार, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की जय, अशा घोषणा देत आणि मेणबत्त्या प्रज्वलित करून रविवारी बिंदू चौकात संयुक्त महाराष्ट्राच्या सीमा लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
मराठा महासंघाच्या पुढाकाराने विविध पक्ष, समाज संघटनांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी वसंतराव मुळीक म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र सीमा लढ्यात कोल्हापूर नेहमीच सीमावासीयांसोबत राहिले आहे. भाषावार प्रांतरचना, भौगोलिक संलग्नता, भाषिक लोकसंख्या व खेडे घटक यानुसार बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात सामील होण्यासाठी गेली ६ दशके न्याय्य मार्गाने लढा सुरू असून कन्नडीगांच्या हडेलहप्पी धोरणाने मराठी भाषिकांना उपेक्षितांचे जीवन जगावे लागत आहे. सध्या हा प्रश्न सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. यावेळी संभाजी जगदाळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बबन रानगे, हसनसो देसाई, शैलजा भोसले, बबिता जाधव, दीपा डोणे, तेजस्विनी नलवडे, शांताबाई पाटील, उज्ज्वला जाधव, अनंत म्हाळुंगेकर, संजय तोरस्कर, बाबूराव बोडके, प्रकाश पाटील, महादेव पाटील, चंद्रकांत चव्हाण, रामचंद्र पवार, शरद साळुंखे, शिवमूर्ती झगडे, किशोर घाडगे, मारुती जाधव, विजय लोंढे, महादेव जाधव यच्च्यासह नागरिक उपस्थित होते.
--
संयुक्त महाराष्ट्रासाठी १७ जानेवारी १९५६ ला पहिले रणशिंग बेळगावच्या भूमीवर फुंकले गेले. या दिवशी या लढ्यात बेळगावमध्ये लक्ष्मण गावडे, महादेव बारागडी, पहिलवान मारुती बेनाळकर, निपाणीमध्ये कमळाबाई मोहिते, कोल्हापुरात शंकरराव तोरस्कर (२५ जानेवारी) हुतात्मे झाले. या दिवसापासून संपूर्ण सीमा भागात हुतात्मादिनी अभिवादन केले जाते.
--
फोटो नं १७०१२०२१-कोल-बिंदू चौक०१,०२
ओळ : कोल्हापुरातील बिंदू चौकात रविवारी बेळगाव, निपाणी, कारवार, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत आणि मेणबत्त्या प्रज्वलित करून संयुक्त महाराष्ट्राच्या सीमा लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)
--