लोकराजाला अभिवादन

By Admin | Updated: May 7, 2016 00:59 IST2016-05-07T00:40:12+5:302016-05-07T00:59:19+5:30

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त

Greetings to the Lokaraja | लोकराजाला अभिवादन

लोकराजाला अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर महापालिक तसेच शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता दसरा चौक येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कादर मलबारी, कृष्णात हारूगडे, रियाज सुभेदार, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, राजदीप सुर्वे, वसंतराव मुळीक, युवराज कदम उपस्थित होते. यानंतर अश्विनी रामाणे आणि डॉ. अमित सैनी यांनी राजर्षी शाहू स्मारक भवन येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Web Title: Greetings to the Lokaraja