रंगबहारच्या वतीने कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 02:31 PM2021-01-16T14:31:56+5:302021-01-16T14:32:43+5:30

कोल्हापूर येथील रंगबहार कला संस्थेमार्फत महर्षी बाबुराव पेंटर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. दळवीज आर्ट स्कुलचे प्राचार्य अ

Greetings to Kalamaharshi Baburao Painter on behalf of Rangbahar | रंगबहारच्या वतीने कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन 

कोल्हापूर येथील पद्माराजे उद्यानातील महर्षी बाबुराव पेंटर यांच्या पुतळ्यास रंगबहारमार्फत पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्राचार्य अजेय दळवी,श्रीकांत डिग्रजकार,विजय टिपुगडे ,मनोज दरेकर,सर्जेराव निगवेकर,धनंजय जाधव आदी उपस्थित होते. 

googlenewsNext
ठळक मुद्देरंगबहारच्या वतीने कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन कलामहर्षींच्या आठवणींचा जागर

कोल्हापूर :  येथील रंगबहार कला संस्थेमार्फत महर्षी बाबुराव पेंटर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. दळवीज आर्ट स्कुलचे प्राचार्य अजेय दळवी यांनी पद्माराजे उद्यानातील महर्षी बाबुराव पेंटर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. 

या कार्यक्रमास श्रीकांत डिग्रजकार, धनंजय जाधव, विजय टिपुगडे, मनोज दरेकर, सर्जेराव निगवेकर, रियाज शेख, संजीव संकपाळ, अतुल डाके हे उपस्थित  होते. या प्रसंगी कलामहर्षींच्या आठवणींचा जागर करण्यात आला. 
बाबूराव पेंटर हे जरी कोल्हापूरचे असले, तरी गुरुंचे गुरू म्हणून त्यांना ओळखतात.

चित्रपटसृष्टीतील पहिलेवहिले तंत्रज्ञान बाबूराव पेंटर यांनीच रूढ केले आहे. यामध्ये भारतीय कॅमेर्‍याने चित्रित केलेला पहिला चित्रपट सैरंध्री असो, याच चित्रपटासाठी स्त्री कलाकाराकडून स्त्री पात्राची भूमिका असो, चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू करण्याचा प्रभातच्या आधी महाराष्ट्र फिल्म कंपनीचे मानचिन्ह असो, निर्मिती, वेशभूषा, ट्रिकसीन असो, की प्रसिद्धीसाठी पोस्टरचा वापर असो, ही सारी तंत्रे पेंटरांनी पहिल्यांदाच चित्रपटासृष्टीत रूढ केली, अशी माहिती अजेय दळवी यांनी दिली. 

श्रीकांत डिग्रजकर म्हणाले, चित्रकार,शिल्पकार ,तंत्रज्ञ,चित्नपट-निर्माते व दिग्दर्शक अश्या बहुआयामी कार्यामुळेच कलामहर्षी म्हणून बाबूराव पेंटर गौरविले जात. प्रतिमा चित्रणातील  कौशल्य व रंगभूमीवरील नेपथ्य, विशेषत: पडद्याची कलात्मकता या बाबतींत त्यांनी खूपच लौकिक मिळविला होता. 

 रियाज शेख यांनी सांगिलते, कि चित्र शिल्प, आदी कलाक्षेत्रात बाबूराव पेंटर यांनी स्वाध्यायाच्या बळावरच आपली प्रगती करून घेतली होती. बाबूराव पेंटर यांच्या चित्रकारितेने रसिकांना भुरळ घातली होती. अशा कालखंडाचे प्रतिनिधी म्हणून बाबूराव पेंटर यांचे कलाकर्तृत्व उदंड मानावे लागेल.

 

Web Title: Greetings to Kalamaharshi Baburao Painter on behalf of Rangbahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.