जिल्ह्यात छत्रपती शिवरायांना अभिवादन

By Admin | Updated: February 20, 2017 00:48 IST2017-02-20T00:48:50+5:302017-02-20T00:48:50+5:30

सर्वत्र शिवमय वातावरण : ठिकठिकाणी भव्य मिरवणूक; शिवरायांचा जयघोष

Greetings to Chhatrapati Shivaji in District | जिल्ह्यात छत्रपती शिवरायांना अभिवादन

जिल्ह्यात छत्रपती शिवरायांना अभिवादन

 

जयसिंगपूर : जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व विविध मंडळांच्या वतीने शहर व परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दणाणला. शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकांमुळे परिसरातील वातावरण शिवमय झाले होते. रविवारी सकाळी पन्हाळगडावरून शिवज्योत नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह क्रीडांगणावर आणण्यात आली. यावेळी शिवज्योतीचे पूजन आदम मुजावर, तर शिवप्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांनी केले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. अभिजित माने, प्रकाश कांबळे, चंद्रकांत दार्इंगडे, चंद्रकांत जाधव, नगरसेवक सर्जेराव पवार, पराग पाटील, शीतल गतारे प्रमुख उपस्थित होते. यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेविका अ‍ॅड. सोनाली मगदूम यांनी केले. डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत क्रांती चौकात करण्यात आले. पालखीत शिवपुतळा ठेवण्यात आला होता, तर हत्तीवरील अंबारीत छत्रपती शिवरायांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती. शिरोळ रोडने मिरवणूक अभियांत्रिकी महाविद्यालयात आली. येथे डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज मगदूम यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात शिवजयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शोभायात्रा, व्याख्याने आदी उपक्रम पार पडले. छत्रपती शिवाजी विद्यालय छत्रपती शिवाजी विद्यालयातर्फे गडहिंग्लज शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेतील ‘राझ्यांच्या पाटलास कठोर शासन’ या सजीव देखाव्याचे विशेष कौतुक झाले. शोभायात्रेचे उद्घाटन ऊर्मिलादेवी शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गणपतराव नेवडे, विठ्ठल मुधोळे, अरुण गायकवाड, रिना देवरकर, आदी उपस्थित होते. सजीव देखाव्यात अथर्व देसाई, अथर्व कुलकर्णी, सम्राट चव्हाण, तन्मय छत्रे-पाटील, रोहित पाटील, ऋतिक वर्मा, अभिमान गायकवाड, वरद घुले, रिया देवरकर, नेताजी जगताप यांनी विविध भूिमका वठविल्या. त्यांना मुख्याध्यापक प्रल्हादसिंह शिलेदार यांचे प्रोत्साहन व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. क्रिएटिव्ह हायस्कूल, गडहिंग्लज गडहिंग्लज येथील क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये संस्था सचिव आण्णासाहेब बेळगुद्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. यावेळी डी. सी. पाटील, पी. पी. पाटील, साक्षी मुधाळकर, केतकी कामत, साईराज पोतदार, प्रथमेश चराटी यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक दिनकर रायकर यांनी प्रास्ताविक केले. आर. आर. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस. शिरगावकर यांनी आभार मानले. किलबिल विद्यामंदिर, गडहिंग्लज येथील किलबिल विद्यामंदिर व इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी शिवशाही ते पेशवाईच्या कालखंडातील विविध व्यक्तिरेखा सादर केल्या. प्रारंभी दयानंद हत्ती यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी संस्थाध्यक्षा अंजली हत्ती, मुख्याध्यापक आनंदा घोलराखे, पूनम हिरेमठ खोराटे आदींसह शिक्षक, पालक उपस्थित होते.

Web Title: Greetings to Chhatrapati Shivaji in District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.