शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

गवत फुला रे गवत फुला, शिवाजी विद्यापीठात फुलला कवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:05 IST

शिवाजी विद्यापीठात कवला किंवा कवळा (विज्ञानातील नाव : स्मिथिया हिऱ्सुता) या आकर्षक गवत फुलाची वनस्पती फुलली आहे. ही फुले कासच्या पठारावर फुलणाऱ्या फुलांची आठवण करून देत आहेत.

ठळक मुद्देगवत फुला रे गवत फुलाशिवाजी विद्यापीठात फुलला कवला

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात कवला किंवा कवळा (विज्ञानातील नाव : स्मिथिया हिऱ्सुता) या आकर्षक गवत फुलाची वनस्पती फुलली आहे. ही फुले कासच्या पठारावर फुलणाऱ्या फुलांची आठवण करून देत आहेत.संशोधक सर जेम्स एडवर्ड स्मिथ यांच्या नावावरून या गवत फुलाला ह्यस्मिथियाह्ण हे नाव देण्यात आले आहे. या कवलाच्या खोडावर केसासारखी रचना दिसते, म्हणून पुढे हिऱ्सुता जोडले गेले. हे झाड हळू वाढते. ते साधारण १५ ते ९० सेंटीमीटरपर्यंत वाढते.

पानथळ जागेतील गवतात मस्त वाढणारी आणि फुलणारी ही वनस्पती पश्चिम घाटातील नामशेष होत जाणाऱ्या वनस्पतींच्या यादीत ही वनस्पती आहे. काही भागांत याच्या पानांची भाजी खात असल्याचा उल्लेख आढळला. जमीन कसदार बनवण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते. ऊन कलायला लागले की कवलाची फुले आणि पाने मिटू लागतात. साधारण लाजाळूसारखी तीन ते चार पर्णिकांच्या जोड्यांची संयुक्त पाने असतात.मिकी माऊस फ्लॉवर्सइतर फुलांबरोबर कासच्या पठारावर ही फुले मोठ्या प्रमाणात आढळतात. पिवळ्या धमक रंगांच्या या फुलांच्या मध्ये लाल रंगाचा आकर्षक ठिपका असतो. त्यामुळे या फुलांचे सौंदर्य खुलून दिसते. त्यांना मिकी माऊस फ्लॉवर्स किंवा डोनाल्ड डक फ्लॉवर्स असेही म्हणतात. जुलैच्या अखेरीस ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत या फुलांचे दर्शन घडते, अशी उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी  दिली. 

टॅग्स :environmentपर्यावरणShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर