शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: म्हाकवेतील आजी-नातीचा ट्रकने ठोकरल्याने जागीच मृत्यू, पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 15:11 IST

देवकार्याचा कार्यक्रम असल्यामुळे गावाकडे येताना काळाचा घाला 

म्हाकवे : पुणे येथे नावले ब्रिजवर बसची वाट पाहत थांबलेल्या आजी व नातीला भरधाव ट्रकने ठोकरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगल सिद्राम पाटील (वय ४०, रा. म्हाकवे), असे आजीचे तर परी सुरेश शेटके (६, रा. हदनाळ, ता. निपाणी), असे नातीचे नाव आहे. अपघाताचे वृत्त समजताच म्हाकवे, हदनाळ गावांवर शोककळा पसरली आहे. घटनेची नोंद पुणे पोलिसांत झाली आहे.म्हाकवे येथील सिद्राम तुकाराम पाटील हे अनेक वर्षांपासून पत्नी व मुलासह पुणे येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांच्या पत्नी मंगल पाटील व नात परी या दोघी हदनाळ येथे देवकार्याचा कार्यक्रम असल्यामुळे गावाकडे येत होत्या. रात्री दहा ते अकराच्या सुमारास नावले ब्रिजजवळ त्या बसची वाट पाहत होत्या. यावेळी ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. संबंधित ट्रक चालकाला पुणे येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

..आनंदी वातावरणाचे रूपांतर शोकसागरातम्हाकवे, हदनाळ पंचक्रोशीत देव दारात आणून वालंग घालणे. देवाचा हा सोहळा त्या कुटुंबाला एक आनंदाचा क्षण आणि समाधानाची पर्वणीच देणारा असतो. या सोहळ्याचा क्षण काही तासांवर आला होता. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आजी- नातही येत होत्या. मात्र, त्या येण्याअगोदरच त्यांच्या अपघाताचे वृत्त समजताच सर्व कुटुंबासह नातेवाईक शोकसागरात बुडाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू