पाचगावात होणार भव्य जिल्हा क्रीडा संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:09+5:302021-01-23T04:24:09+5:30
पाचगाव : पाचगावात क्रीडांगण व जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नुकतीच पाचगावातील ...

पाचगावात होणार भव्य जिल्हा क्रीडा संकुल
पाचगाव : पाचगावात क्रीडांगण व जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नुकतीच पाचगावातील गायरानच्या जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी लवकरात लवकर क्रीडा संकुलाबाबत शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही देत तातडीने प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पाचगावात क्रीडांगण व जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव पाचगाव ग्रामपंचायतीने दिला होता. यासंदर्भात पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील व दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी जागेची पाहणी करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी देसाई यांनी क्रीडांगण व जिल्हा क्रीडा संकुलासाठी जागेची पाहणी केली. यावेळी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे, सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच विष्णू डवरी, नारायण गाडगीळ, संजय पाटील, संग्राम पोवाळकर, शिवाजी दळवी, युवराज पाटील, एम. एस. पाटील, सातप्पा पाटील, ग्रामविकास अधिकारी संजय लंबे उपस्थित होते.
फोटो २२ पाचगाव जिल्हाधिकारी देसाई
पाचगाव येथे क्रीडांगण व जिल्हा पातळीवरील भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रस्तावित जागेची पाहणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली. यावेळी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे, सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच विष्णू डवरी, नारायण गाडगीळ, संजय पाटील उपस्थित होते.