आजपासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST2020-12-14T04:35:57+5:302020-12-14T04:35:57+5:30
मार्च ते जुलै या कालावधीत मुदत संपलेल्या, पण कोरोनामुळे निवडणुका न होऊ शकल्याने प्रशासक आलेल्या जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचा निवडणूक ...

आजपासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान
मार्च ते जुलै या कालावधीत मुदत संपलेल्या, पण कोरोनामुळे निवडणुका न होऊ शकल्याने प्रशासक आलेल्या जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या गावांच्या निवडणुकीसाठी प्रभाग निश्चितीसह सर्व प्रक्रिया यापूर्वीच तयार करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता फक्त औपचारिकता बाकी असली तरी कोरोना कालावधीत मृत मतदारांमुळे मतदार यादीचे काम नव्याने हाती घेण्यात आले. आता अंतिम मतदार यादीचे काम पूर्ण झाले असून, त्यावर आज प्रसिद्धीचे अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. या मतदार यादीनुसारच मतदान प्रक्रिया होणार आहे.
चौकट ०१
२३ ते ३० डिसेंबर : अर्ज भरण्यास सुरुवात
३१ डिसेंबर : अर्जाची छाननी
४ जानेवारी : अर्ज माघार व चिन्ह वाटप
१५ जानेवारी : मतदान
१८ जानेवारी : मतमोजणी
२१ जानेवारी : निकाल
चौकट ०२
कागलमध्ये ८३ पैकी ५३ गावांत, गडहिंग्लजमध्ये ८९ पैकी ५० गावांत, शिरोळ तालुक्यात ५२ पैकी ३३ गावांत निवडणुका होत आहेत. हे प्रमाण अनुक्रमे ६३.८५, व ६५.१७ टक्के इतके होते. निवडणूक नियोगाच्या नियमानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त भागात निवडणुका होणार असतील, तर तेथे संपूर्ण आचारसंहिता लागू होते. या नियमानुसार शंभर टक्के आचारसंहिता लागू होणार असल्याने या तीन तालुक्यांतील शासकीय विकासकामे २१ जानेवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थांबणार आहेत.