कोल्हापूर: तिरखडे (ता. भुदरगड) येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रचार सभेत मतदारांना व विरोधी उमेदवारांना जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे चिरंजीव विश्वजित यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माजी सभापती बाबा नांदकर यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.तिरवडे-कुडतरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. लोकनियुक्त सरपंचपदासाठी माजी आमदार यांच्या स्नुषा शुभांगी विश्वजित जाधव निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी विश्वलित जाधव यांनी तिरवडे येथे लोकांचा जमाव करून कुंदरवाडीत मंगळवारी रात्री सभा घेतली. यावेळी मतदारांना व विरोधी पॅनलच्या उमेदवारांना मागच्या वेळी वाचलास काय वाट्टेल ते झाले तरी आम्हाला येथे शुभांगीची सिट निवडून येणे गरजेचे आहे. जर शुभांगीचं काय झाले तर इथे वाईट परिणाम होणार एवढंच सांगतो असे म्हणून सामाजिक शांतता भंग करण्याचे व कायदेशीर सुव्यस्था बिघडवण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. मतदारांना धमकावून आचारसंहितेचा भंग केला आहे. त्याच्या अशा वक्तव्यामुळे मतदारही भीतीच्या छायेखाली आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
पत्नी सरपंचपदाच्या रिंगणात, पराभव झाल्यास.., माजी आमदाराच्या मुलाने मतदार-विरोधी उमेदवारांना दिली जिवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:06 IST