शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:38 IST

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण २७६ महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठाने या महाविद्यालयांवर पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याची ...

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण २७६ महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठाने या महाविद्यालयांवर पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याची जबाबदारी सोपविली आहे. विद्यापीठाच्या सूचनांनुसार बहुतांश महाविद्यालयांनी सोमवारपासून या परीक्षांची सुरुवात केली. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यावेळेत प्रत्येकी एक तासाच्या विविध सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून स्मार्टफोन, लॅॅपटॉप, टॅॅब, संगणक यापैकी एका माध्यमाचा वापर करून ऑनलाईन परीक्षा दिली. प्रथम वर्षाच्या परीक्षांच्या नियोजनासाठी महाविद्यालयांनी त्यांच्या पातळीवर परीक्षा समिती गठित केली आहे. त्यामध्ये प्रत्येक विद्याशाखेतील एका प्राध्यापकांचा समावेश केला आहे. या समितीसह दोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. एक-दोन विद्याशाखा असणाऱ्या काही महाविद्यालयांनी बुधवार (दि. ५) पासून परीक्षांची सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे. त्यातील काही महाविद्यालयांमध्ये सोमवारी विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्यात आली. दरम्यान, विद्यापीठाने विविध २५ अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सोमवारी घेतली. त्यासाठी २९४३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८८१७ जणांनी ऑनलाईन परीक्षा दिली. या परीक्षेला ६२१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

चौकट

लॉगीनला विलंब झाल्याने वेळ वाढविला

प्रथम वर्षाच्या परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी लॉगीन करण्यातील तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांना

विलंब झाला. त्यांना वेळ वाढवून देण्यात आला. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी लॉगीन केले नाही. त्यांच्याशी महाविद्यालयांतील परीक्षा समिती, हेल्पलाईनने संपर्क साधून त्यांची तांत्रिक अडचण दूर केली. या स्वरूपातील कार्यवाही न्यू कॉलेजमध्ये करण्यात आली.