ग्रा.पं. निवडणूक; भाजपाकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 07:12 IST2017-03-20T07:12:33+5:302017-03-20T07:12:33+5:30

राज्यातील आगामी ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय भाजपाने घेतला असून त्या दृष्टीने पहिली आढावा बैठक

G.P. Election; Review by BJP | ग्रा.पं. निवडणूक; भाजपाकडून आढावा

ग्रा.पं. निवडणूक; भाजपाकडून आढावा

कोल्हापूर : राज्यातील आगामी ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय भाजपाने घेतला असून त्या दृष्टीने पहिली आढावा बैठक रविवारी येथे झाली.
गावपातळीवर विकासाला गती देण्यासाठी तेथेही सत्ता मिळविण्याचे पक्षाने ठरविले आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या सहा महिने आधीच पक्षाने तयारी सुरू केली आहे. भाजपाचे संघटनमंत्री बाबा देसाई यांनी रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुकाध्यक्षांची बैठक घेतली. त्यात आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: G.P. Election; Review by BJP