शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : साडेसहा लाख लिटर दूध घरातच, ‘गोकुळ’चे संकलन बंद : आंदोलनास उस्फूर्त पाठिंबा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 15:46 IST

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळचे दूध संकलन केले नाही. संघाचे सकाळी साडेसहा लाख लिटर दूध संकलन होते. हे सर्व दूध गुरुवारी शेतकऱ्यांच्या घरातच राहिले. 

ठळक मुद्देसाडेसहा लाख लिटर दूध घरातच‘गोकुळ’चे संकलन बंद : आंदोलनास उस्फूर्त पाठिंबा 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळचे दूध संकलन केले नाही. संघाचे सकाळी साडेसहा लाख लिटर दूध संकलन होते. हे सर्व दूध गुरुवारी शेतकऱ्यांच्या घरातच राहिले. 

बंद संपल्यावर सायंकाळचे संकलन मात्र संघाने केले. ज्यादिवशी संकलन होत नाही, त्या दिवशीचे दूध बिल दिले जात नाही. त्यामुळे एक वेळचे संकलन बंद राहिल्याने शेतकऱ्यांना सुमारे अडीच कोटींचा फटका बसला.आरक्षणासाठी मराठा समाजाने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. बंद काळात दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड होते व समाजाचा आंदोलनास पाठिंबा म्हणूनही संघाने संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

सुमारे ३५० टेम्पोंमधून हे दूध ‘गोकुळ’कडे येते; परंतु गुरुवारी एकही टेम्पो रस्त्यावर आला नाही. सकाळी घरोघरी भल्या पहाटेपासून सुरू असलेली महिलांची लगबगही काहीशी मंदावली होती. म्हैशीच्या धारा तरी काढाव्याच लागल्या; परंतु त्या दुधाचा कुटुंबातच आस्वाद घेतला.‘गोकुळ’ने एक वेळचे दूध संकलन बंद केल्याने पुणे, मुंबईतील दूध वितरणावर परिणाम होऊ नये म्हणून संघाने बुधवारीच जास्त टँकर पाठविले होते. दिवसात तीन पाळीत प्रत्येकी २० टँकर मुंबईला जातात. गुरुवारी सकाळी व दुपारी टँकर गेलेच नाहीत. रात्री उशिरा टँकर पाठविण्यात आल्याची माहिती संघाच्या सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMilk Supplyदूध पुरवठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर