गोविंद पानसरे हत्या प्रकरण : समीर गायकवाडने दाखल केलेला तपासी अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:02 IST2018-07-25T12:59:44+5:302018-07-25T13:02:19+5:30
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित व सध्या जामिनावर बाहेर असलेल्या समीर गायकवाडने एका साक्षीदार विरोधात दाखल केलेला तपासी अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला.

गोविंद पानसरे हत्या प्रकरण : समीर गायकवाडने दाखल केलेला तपासी अर्ज फेटाळला
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित व सध्या जामिनावर बाहेर असलेल्या समीर गायकवाडने एका साक्षीदार विरोधात दाखल केलेला तपासी अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला.
पानसरे हत्या प्रकरणातील एक साक्षीदार हा पूर्वी शस्त्रास्त्रांची विक्री करत होता, त्याला आरोपी करावे, अशी खासगी फिर्याद समीर गायकवाडने जुना राजवाडा पोलिसांत दिली होती. याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात झाली होती.
या न्यायालयाने हा तपासी अर्ज फेटाळल्यानंतर गायकवाडने या विरोधात जिल्हा न्यायालयात अपील केले होते. याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांच्या न्यायालयात दोनवेळा झाली. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निंबाळकर यांनी गायकवाडचा तपासी अर्ज नामंजूर केला.
साडविलकर यांच्यातर्फे अॅड. प्रशांत सामंत व अॅड. क्षितिज सामंत तर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. ए. एम. पिरजादे यांनी काम पाहिले.