राज्यपालांचा कोल्हापुर दौरा रद्द, दीक्षांत समारंभासह अन्य होते कार्यक्रम

By समीर देशपांडे | Updated: December 18, 2023 10:23 IST2023-12-18T10:22:33+5:302023-12-18T10:23:05+5:30

राज्यपाल रमेश बैेस यांचा आज सोमवारी होणारा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे.

Governor's visit to Kolhapur canceled There were other events including the convocation ceremony | राज्यपालांचा कोल्हापुर दौरा रद्द, दीक्षांत समारंभासह अन्य होते कार्यक्रम

राज्यपालांचा कोल्हापुर दौरा रद्द, दीक्षांत समारंभासह अन्य होते कार्यक्रम

समीर देशपांडे

कोल्हापूर   :   राज्यपाल रमेश बैेस यांचा आज सोमवारी होणारा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार होते. गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या प्रशासकीय तयारीवर यामुळे पाणी फिरले आहे. 

 राज्यपालांच्या सकाळी १० वाजता कोल्हापुरात येणार होते. अंबाबाई दर्शन, रोटरी क्लब कार्यालय भेट, स्वयंम रेडक्राॅस शाळेला भेट, शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ, कंदलगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेला भेट असे त्यांचे भरगच्च कार्यक्रम हाेणार होते. सव्वा तीन वाजता ते मुंबईला परत जाणार होते. दरम्यान उजळाईवाडी विमानतळावर मराठा आरक्षण आंदोलकांशीही त्याची चर्चा होणार होती. परंतू त्यांचा दौराच रद्द झाला आहे. गेले १५ दिवस प्रशासनच्यावतीने आणि स्वयंसेवी संस्थांच्यावतीने त्यांच्या दौऱ्याची तयारी सुरू होती.

Web Title: Governor's visit to Kolhapur canceled There were other events including the convocation ceremony