स्कूल बस अपघातातील बळींच्या संख्येबाबत सरकारच अनभिज्ञ

By Admin | Updated: December 16, 2014 23:49 IST2014-12-15T23:21:45+5:302014-12-16T23:49:02+5:30

गेल्या वर्षी राजधानी दिल्लीत स्कूल बसच्या अपघातांमध्ये नेमक्या किती शाळकरी मुलांचा बळी गेला, याची सरकारला माहिती नाही

The government is unaware of the number of victims of the school bus accident | स्कूल बस अपघातातील बळींच्या संख्येबाबत सरकारच अनभिज्ञ

स्कूल बस अपघातातील बळींच्या संख्येबाबत सरकारच अनभिज्ञ

कुरुंदवाड : येथील श्री स्पोर्टस् क्रीडा संस्थेने आयोजित केलेल्या ४६व्या राज्य व्हॉलिबॉल स्पर्धेत पुरुष-महिला गटांत नागपूरच्या संघांनी दुहेरी मुकुट पटकावत अजिंक्यपदावर नाव कोरले. पुरुष गटात मुंबई उपनगर संघ, तर महिला गटात पुणे संघ उपविजेता ठरला.
पुरुष गटानेही जिगरबाज खेळी करीत मुंबई उपनगराला २५-२०, २३-२५, २५-१९, २८-३० व १५-९ अशा सेटनी तीन विरुद्ध २ गुणांनी पराभूत केले. पहिला सेट नागपूर संघाने
२५-२० अशा फरकाने जिंकला, तर दुसरा सेट मुंबई संघाने २५-२३ असा जिंकून गुणात बरोबरी साधली. नागपूर संघाने सौरभ लोकरे, नीलेश मते, एस. सहदेव. पी. बाला टंडन व जे. तिवारी यांच्या उत्कृष्ट खेळीने नंतरचे दोनही सेट अत्यंत चिकाटीने जिंकले, तर मुबंई उपनगरच्या कल्पेश पटेल, दिग्विजय पानसरे, दिग्विजय साळुंखे, अंकित चौधरी, जी. भडंगे यांनीही तितक्याच जोराने प्रत्युत्तर दिले. मात्र, नागपूरच्या सांघिक खेळीपुढे मुंबई उपनगरला हार पत्करावी लागली.
या अटीतटीच्या लढतीमुळे तब्बल अडीच तासांहून अधिक काळ सामना रंगला. या रंगलेल्या सामन्यामुळे मध्यरात्रीपर्यंतही स्टेडीयममधील एकाही क्रीडाशौकीनाने जागा सोडली नाही.
महिला गटातील अंतिम लढतीतही नागपूर विरुद्ध पुणे यांच्या झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत नागपूर संघाने पुणे संघावर २०-२५, २५-१८, २५-१८ व २७-२५ अशा सेटने मात करीत विजय मिळविला. दोन्ही संघांनी प्रत्येक गुणासाठी पाठलाग केल्याने चार सेटवर तब्बल सव्वादोन तास सामना रंगला.
पुणे संघाच्या अनिता झाकरीस व अमिता झाकरीस या जुळ्या बहिणींनी सरस कामगिरी केली. त्यांना स्नेहा भगत, प्रियंका धोत्रे, प्रियदर्शनी कोकरे यांनी चांगली साथ दिली. मात्र, नागपूर संघाची नामांकित खेळाडू भाग्यश्री धार्मिक, लिफ्टर दिशा देवाळकर, सिमरन चौधरी यांच्या उत्कृष्ट
सांघिक खेळापुढे पुणे संघाला नामोहरम व्हावे लागले. पुणे संघाने पहिला सेट २५-२० फरकाने जिंकला. मात्र, नागपूर संघाने चिवट खेळी करीत सलग तीनही सेट जिंकत विजेतेपद पटकाविले.
विजेत्या संघांना माजी मंत्री सतेज पाटील, नगराध्यक्ष संजय खोत, मयूर दूध संघाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: The government is unaware of the number of victims of the school bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.