शासकीय जनसंपर्काचे कार्य खूप आव्हानात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:27 AM2021-09-18T04:27:26+5:302021-09-18T04:27:26+5:30

कोल्हापूर : नवमाध्यमांचा उदय आणि जनतेकडून त्याचा होत असलेला अधिक वापर यामुळे शासकीय जनसंपर्काचे कार्य खूप आव्हानात्मक बनले ...

Government public relations work is very challenging | शासकीय जनसंपर्काचे कार्य खूप आव्हानात्मक

शासकीय जनसंपर्काचे कार्य खूप आव्हानात्मक

Next

कोल्हापूर : नवमाध्यमांचा उदय आणि जनतेकडून त्याचा होत असलेला अधिक वापर यामुळे शासकीय जनसंपर्काचे कार्य खूप आव्हानात्मक बनले आहे, असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी शुक्रवारी केले. शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागातर्फे आयोजित ‘शासकीय जनसंपर्क’ या विषयावरील राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनारच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते.

शासकीय जनसंपर्काचे कार्य करताना आज लोकांच्या हातात नवमाध्यम उपलब्ध असल्यामुळे ते सरळ प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी स्वतःला अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे संदीप माळवी यांनी सांगितले. वेबिनारच्या दुसऱ्या सत्रामध्ये सोलापूरमधील क्षेत्र प्रसिद्धी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी कोरोना काळात क्षेत्र प्रसिद्धी विभागाने केलेल्या विविध कार्यांची माहिती दिली. भारतीय माहिती सेवा क्षेत्रात उपलब्ध नोकरीच्या संधी आणि तयारीबाबत मार्गदर्शन केले. मुंबईतील पत्र सूचना कार्यालयाचे महेश चोपडे यांनी केंद्र शासनाचा जनसंपर्क, डीएव्हीपी, पत्र सूचना कार्यालय, सेन्सॉर बोर्डमधील कार्यपद्धतीची माहिती दिली. विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी प्रास्ताविक केले. सहयोगी प्राध्यापक सचिन दिवाण यांनी आभार मानले. या वेबिनारमध्ये राज्यभरातील १९० विद्यार्थी सहभागी झाले होते.

फोटो (१७०९२०२१-कोल-संदीप माळवी (युनिव्हर्सिटी)

170921\17kol_8_17092021_5.jpg

फोटो (१७०९२०२१-कोल-संदिप माळवी (युनिर्व्हेसिटी)

Web Title: Government public relations work is very challenging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app