शासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती करावी - कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST2020-12-24T04:22:14+5:302020-12-24T04:22:14+5:30
निवेदनात म्हटले आहे की, सिटी सर्व्हे ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी गेले कित्येक दिवस भेटत नाहीत. त्यांच्या केबिनला कुलूपच असते. येथे ...

शासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती करावी - कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, सिटी सर्व्हे ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी गेले कित्येक दिवस भेटत नाहीत. त्यांच्या केबिनला कुलूपच असते. येथे अगदी किरकोळ वारस नोंद प्रकरणे प्रलंबित आहेत. भूमी अभिलेख कार्यालयात एजंटशिवाय कामच होत नाही. दोन-दोन वर्षे झाली तालुक्याचे ऑडिट नाही. नगररचना विभागाचे सहायक संचालक जागेवर नसतात. कधी भेटले तरी कामे प्रलंबित ठेवतात. उपनिबंधक कार्यालयात सातबारा उतारा कोरा असला तरीही संपादन दाखल्याची मागणी करतात. हेच काम एजंटमार्फत करताना ही मागणी होत नाही. बी टेन्युअर काढण्याबाबत आपले आदेश असूनही त्याची माहिती व्यवस्थित मिळत नाही. देवस्थान जमिनीबाबतही बी टेन्युअरचा बराच घोळ आहे. रि.स.नं. १४७२ मधील बरीच प्रकरणे प्रलंबित आहेत. क्रीडा विभागाच्या उपसंचालकांनी आपला कार्यभार स्वीकारून दहा महिने झाले; पण ते जागेवर क्वचितच भेटतात.
महापालिका कार्यालयातही अधिकारी बहुतांशी वेळा हजर नसतात. तरी याबाबत महापालिका तसेच शासकीय कार्यालयांमध्ये सूचना करण्यात यावी. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, पी. आर. गवळी, लहुजी शिंदे, महेश जाधव, एस. एम. गायकवाड, श्रीकांत भोसले, सुनीलकुमार सरनाईक, चंद्रकांत सूर्यवंशी ,आदी उपस्थित होते.
---
फोटो नं २३१२२०२०-कोल-कृती समिती
ओळ :कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना शासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे या मागणीचे निवेदन दिले. (छाया : नसीर अत्तार)
--
इंदुमती गणेश