Government lapses with floods: Jogendra Kawade | पुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे

पुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे

ठळक मुद्देपुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे पूररेषेतील अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई करा

कोल्हापूर : महापुराचा नैसर्गिक आपत्ती म्हणून कोल्हापूरकरांना मोठा फटका बसला; परंतु शासकीय व प्रशासकीय ढिसाळपणाचाही फटका त्यांना बसला आहे, अशी टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

पूररेषेतील अनधिकृत बांधकामे थांबवावीत, तसेच अशी बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

शहरातील सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, जगदीश कवाडे, लता नागावकर, आदी उपस्थित होेते.
 

 

Web Title: Government lapses with floods: Jogendra Kawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.