पुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:23 IST2019-08-20T18:20:29+5:302019-08-20T18:23:52+5:30
महापुराचा नैसर्गिक आपत्ती म्हणून कोल्हापूरकरांना मोठा फटका बसला; परंतु शासकीय व प्रशासकीय ढिसाळपणाचाही फटका त्यांना बसला आहे, अशी टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली. पूररेषेतील अनधिकृत बांधकामे थांबवावीत, तसेच अशी बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे
कोल्हापूर : महापुराचा नैसर्गिक आपत्ती म्हणून कोल्हापूरकरांना मोठा फटका बसला; परंतु शासकीय व प्रशासकीय ढिसाळपणाचाही फटका त्यांना बसला आहे, अशी टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
पूररेषेतील अनधिकृत बांधकामे थांबवावीत, तसेच अशी बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शहरातील सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, जगदीश कवाडे, लता नागावकर, आदी उपस्थित होेते.