शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
3
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Viral Video: "दातं आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
6
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
7
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
8
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
9
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
10
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
11
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
12
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
13
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
14
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
15
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
17
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
18
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
19
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
20
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार

कोल्हापुरात गुंडांनी कॉलर पकडून पोलिसाला केली धक्काबुक्की, रस्त्यात वाढदिवस करण्यावरून हटकल्याने घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:51 IST

कॉलर पकडून धक्काबुक्की, तिघांना अटक

कोल्हापूर : रस्त्यात लावलेल्या दुचाकीवर केक ठेवून आरडाओरडा करीत वाढदिवस साजरा करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून तीन सराईत गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिस हवालदार पंढरीनाथ इश्राम सामंत यांची कॉलर पकडून गुंडांनी धक्काबुक्की केली. हा प्रकार सोमवारी (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास लक्षतीर्थ वसाहतीमधील शाहू चौकात घडला.हवालदार सामंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लक्ष्मीपुरी पोलिसांनी सराईत गुंड सादिक मोहम्मद पाटणकर (वय २०), अवधूत पिराजी गजगेश्वर (१९) आणि आदित्य राहुल भोजणे (२२, तिघे रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. फिर्यादी सामंत यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री ते सहकारी सौरव कोळी यांच्यासोबत लक्षतीर्थ वसाहत येथे गस्त घालण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. शाहू चौकात काही तरुण रस्त्यात मध्येच दुचाकी लावून आदित्य भोजणे याचा वाढदिवस साजरा करीत होते. दुचाकीवर केक ठेवून आरडाओरडा करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी हटकले. रस्त्यात वाढदिवस साजरा करू नका, असे सांगताच सादिक पाटणकर, अवधूत गजगेश्वर आणि भोजणे हे शिवीगाळ करीत पोलिसांच्या अंगावर धावून गेले. यातील पाटणकर याने हवालदार सामंत यांच्या शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.भर चौकात गुंडांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा आणि कॉलर पकडण्याचा प्रकार घडल्याने सामंत यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तिन्ही हल्लेखोरांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली.तिघेही सराईतअटकेतील तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मारामारी, धमकावणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, जीवघेणा हल्ला करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत मजलभर चौकात पोलिसाची कॉलर पकडून त्यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक कमी झाला आहे काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गुंडांवर ठोस कारवाई करून पोलिसांनी वर्दीचा धाक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Goons Assault Policeman for Stopping Roadside Birthday Celebration

Web Summary : In Kolhapur, three goons attacked a policeman for objecting to a roadside birthday celebration. The attackers, already known to the police, were arrested and remanded to police custody. The incident raises concerns about diminishing respect for law enforcement.