शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

एक रुपये पीकविमा योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील 'हे' तालुके आघाडीवर, ऊस पट्ट्यात प्रतिसाद कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 15:45 IST

यंदा १५ हजार हेक्टरवरील पिकांना मिळणार विमा कवच

कोल्हापूर : सरकारच्या वतीने यंदा एक रुपयात पीकविमा योजना आणली, त्याला जिल्ह्यातून तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाला. ५५ हजार ३०७ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदवला असून, ‘राधानगरी’, ‘आजरा’ व ‘चंदगड’ तालुके आघाडीवर राहिले आहेत. १५ हजार हेक्टरवरील पिकांना यंदा विमा कवच मिळणार असून, ऊस पट्ट्यात शिरोळ, कागल तालुक्यात प्रतिसाद कमी दिसत आहे.नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत येतो. त्यातून सावरण्यासाठी सरकारच्या वतीने पीकविमा योजना गेल्या अनेक वर्षापासून राबवली जाते. मात्र, त्याचा हप्ता व जोखीम पाहता शेतकरी पीकविम्याकडे पाठ फिरवत होते. यासाठी यंदाच्या खरीप हंगामापासून सरकारने एक रुपयात पीकविमा योजना आणली आहे. शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया घ्यायचा आणि त्याचे लाभ पूर्वीप्रमाणेच दिले जाणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात नेहमीच्या पीकविमा योजनेप्रमाणे त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.मात्र, कृषी विभागाने गावोगावी प्रबोधन केल्यानंतर शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्प्यात ३१ जुलैपर्यंत विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत होती. त्यामध्ये चार दिवसांची वाढ करण्यात आली. या कालावधीत जिल्ह्यातील ५५ हजार ३०७ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवला. यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी एक रुपयांप्रमाणे ५५ हजार २६७ रुपये घेतले, तर राज्य सरकारने २ कोटी ६६ लाख ४९ हजार रुपयांचा हप्ता विमा कंपनीला दिला आहे.९० टक्के अल्पभूधारक शेतकरीपीकविम्यात ९० टक्के म्हणजेच ४९ हजार ८५४ शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. उर्वरित शेतकरी हे मोठे आहेत, यावरून लहान शेतकऱ्यांनाच विमा संरक्षणाची गरज अधिक दिसते.

तालुकानिहाय सहभागी शेतकरी व क्षेत्र हेक्टरमध्ये

तालुका - कर्जदार - बिगरकर्जदार - क्षेत्रआजरा           - १४   - ५२२४  -  १३०३गगनबावडा   - ११    - २७७१  -  ८१०भुदरगड        - ८०   - १९५० -   ४७९चंदगड          - १७१   -७२६१  - २५७६गडहिंग्लज     - १३   - ६५३५  -  १९४१हातकणंगले   - १३  -  ४३०३  -   १५२०कागल           - ३५   - २८२५   - ९०८करवीर          - ९     -  ६१०१ -   १३७७पन्हाळा         - ३१   -  ३८२१  -   ८२१राधानगरी      - २३  -  ८०८६  -  १६२८शाहूवाडी       -  ३३ -  ३०४३   - ७६६शिरोळ           - ०    -  ३००४  -  १३७५

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी