कोल्हापूरच्या शाहू मानेला आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:28 IST2019-05-12T01:26:40+5:302019-05-12T01:28:39+5:30
येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या शाहू तुषार माने याने ज्युनियर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

कोल्हापूरच्या शाहू मानेला आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक
हनोव्होर (जर्मनी) : येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या शाहू तुषार माने याने ज्युनियर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
ज्युनियर गटात पात्रता फेरीत शाहूने ६२३.२ गुण मिळवले. अंतिम फेरीत शाहूने एकूण २५१.४ गुण पटकावले. रुद्राक्ष पाटीलचे सुवर्ण २.८ गुणांनी हुकले. त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक ज्युनियर चॅम्पियन हृदय हजारिका याने त्याला मागे टाकले.
पुरुषांच्या एअर रायफलमध्ये अनुभवी रवि कुमार आणि दीपक कुमार यांना अनुक्रमे पाचव्या आणि सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत तिसऱ्या क्रमांकाने पात्र ठरलेला तेजस कृष्ण प्रसाद ६२७.९ गुणांसह आठव्या स्थानावर राहिला. महिला गटात २५ मीटर पिस्तूल प्रकारात अन्नू राजसिंहने कांस्यपदक जिंकले, तर अभिज्ञा पाटीलने ५७६ गुण मिळवून ज्युनियर महिला गटात रौप्यपदक जिंकले.