टर्फ क्रिकेट स्पर्धेत सोना चांदी संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST2021-03-31T04:24:19+5:302021-03-31T04:24:19+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने आयोजित टर्फ प्रीमियम क्रिकेट लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सोना चांदी संघाने राठोड ...

टर्फ क्रिकेट स्पर्धेत सोना चांदी संघ विजेता
कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने आयोजित टर्फ प्रीमियम क्रिकेट लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सोना चांदी संघाने राठोड रॉयल्सवर विजय मिळवत चषक पटकावला. विजेत्या संघास २१ हजार रुपये व चषक व उपविजेत्या संघास ११ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत बारा संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर) यांच्यासह राजेंद्र पोतदार (हुपरीकर), मंगेश शेट्ये, जे.के. गांधी, के.जी. ओसवाल, बिपीन परमार, प्रसाद कालेकर, प्रीतम ओसवाल सुहास जाधव, शेखर पोतदार, सेजल राठोड, विपुल ओसवाल, हर्षल (बंटी) राठोड उपस्थित होते.
--
फोटो नं ३००३२०२१-कोल-सराफ संघ
ओळ : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने आयोजित टर्फ प्रीमियर क्रिकेट लीग सामन्यातील विजयी सोना चांदी संघाला कुलदीप गायकवाड, जितेंद्र राठोड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.