गोकूळचा कारभार जनताभिमुख करणार -विश्वास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:10 IST2021-08-02T04:10:02+5:302021-08-02T04:10:02+5:30

शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे करवीर तालुका पश्चिम भागातील ४० दूध संस्थेतर्फे दुधाला दोन रुपये जादा दर दिल्याबद्दल आयोजित ...

Gokul's administration will be people-oriented - Vishwas Patil | गोकूळचा कारभार जनताभिमुख करणार -विश्वास पाटील

गोकूळचा कारभार जनताभिमुख करणार -विश्वास पाटील

शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे करवीर तालुका पश्चिम भागातील ४० दूध संस्थेतर्फे दुधाला दोन रुपये जादा दर दिल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात विश्वासराव पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नंदकुमार पाटील होते.

यावेळी सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून दूध संस्थेतर्फे भगवान दिंडे यांच्या हस्ते गोकूळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण कवी अनिल बचाटे, भानुदास पाटील, वैभव कांबळे, विनायक देसाई, नंदकुमार पाटील आदींची भाषणे झाली. प्रारंभी वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे यांनी स्वागत केले. एस. डी. जरग यांनी आभार मानले. तुकाराम पाटील, माधव पाटील, बलभीम विकास संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, छत्रपती शाहू संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील, गोकूळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, यांच्यासह ४० दूध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

.

फोटो ओळ - शिरोली दुमाला ( ता. करवीर ) येथे गोकूळ दध संघाने शेतकऱ्यांना दोन रुपये जादा दर दिल्याबद्दल दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा करवीर पश्चिम भागातील दूध संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी तुकाराम पाटील, नंदकुमार पाटील, भगवान दिंडे, अनिल सोलापुरे, एस. के. पाटील, सचिन पाटील, माधव पाटील यांच्यासह दूध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Gokul's administration will be people-oriented - Vishwas Patil