शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

‘गोकुळ’ सोलापूर जिल्ह्यात राबवणार १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प, वर्षाला विजेवरील साडे सहा कोटी रुपये वाचणार

By समीर देशपांडे | Updated: January 6, 2024 12:28 IST

वार्षिक खर्चामध्ये बचत करण्यासाठी ‘गोकुळ’ने नव्या वर्षात हे पाऊल टाकले

समीर देशपांडे कोल्हापूर : देशातील दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य ‘गोकुळ’ दूध संघाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘गोकुळ’चे विजेपोटी वर्षाला खर्च होणारे तब्बल साडे सहा कोटी रुपये वाचणार आहेत. एकूणच वार्षिक खर्चामध्ये बचत करण्यासाठी ‘गोकुळ’ने नव्या वर्षात हे पाऊल टाकले आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या ‘ओपन ॲक्सेस स्कीम’मधून अशा पद्धतीची सौरऊर्जा निर्माण करून ती वीज मंडळाला पुरवली जाणार असून, त्या बदल्यात वीज मंडळ ‘गोकुळ’च्या वीजबिलाचा दर कमी करणार आहे. सध्या दूध संघाला वर्षाकाठी वीजबिलाचा खर्च १३ कोटी रुपये येतो. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या बाबींमध्ये बचत करता येईल याचा विचार पुढे आल्यानंतर वीजबिलाच्या बचतीसाठी सौरऊर्जेचा पर्याय समोर आला. यातून मग सोलापूर जिल्ह्यातील हा प्रस्ताव पुढे आल्यानंतर संबंधित कंपनीशी करार करण्यात आला आहे.

यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील दिंडेवाडीजवळ ‘गोकुळ’ने १८ एकर जागा खरेदी केली आहे. याच ठिकाणी २०० एकरवर पुणे येथील सार्जन रिॲलिटी प्रा. लि. ही कंपनी सौरऊर्जा निर्मिती करीत आहे. याच कंपनीच्या मार्फत या सोलरपार्कमधून रोज साडे सहा मेगावॅट वीजनिर्मिती ‘गोकुळ’ करणार आहे.या ठिकाणी ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून पूर्ण करून देण्यासह जमीन खरेदीची रक्कम असा हा ३३ कोटी ३३ लाख रुपयांचा प्रकल्प आहे. यातून निर्माण होणारी वीज वीज मंडळाला पुरविल्यानंतर गोकुळला सध्या प्रतियुनिट येणारा खर्च १० रुपयांऐवजी ३ रुपये येणार असून, ही वार्षिक बचत साडे सहा कोटींवर जाणार आहे. याच हिशोबाने केवळ पाच वर्षांमध्ये या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च वसूल होणार आहे. यासाठी राष्ट्रीय डेअरी डेव्हपमेंट बोर्डकडे ‘गोकुळ’ने २५ कोटी ४७ लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली असून, त्याचे हप्ते या बचत झालेल्या रकमेतून अदा केले जाणार आहेत.

‘गोकुळ’च्या दैनंदिन खर्चामध्ये काटकसर करण्यासाठी आम्ही काही गोष्टी ठरवत असताना सौरऊर्जा प्रकल्पाची कल्पना पुढे आली. याबाबत अभ्यास करून या प्रकल्पाची आखणी आम्ही केली आहे. याची निविदा प्रक्रिया झाली असून, ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जाऊन ऑगस्ट २०२४ पासून प्रत्यक्षात वीजनिर्मिती सुरू होणार आहे. - अरुण डोंगळे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळSolapurसोलापूरsolar eclipseसूर्यग्रहण