गडहिंग्लज : सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गोकुळ आणि केडीसी बँकेची निवडणूक ताकदीने लढवली जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी चंदगड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रामाप्पा करिगार यांनी केली.भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य मजूर फेडरेशनचे संचालक उदय जोशी होते.अंतर्गत गटबाजी संपवून पक्षसंघटना पुन्हा मजबूत करावी, अशी सूचना कार्यकर्त्यांनी यावेळी केली. माजी सभापती अमर चव्हाण, जयसिंग चव्हाण, राजेश पाटील - औरनाळकर, बाबुराव चौगुले, तानाजी शेंडगे, महाबळेश्वर चौगुले, शिवप्रसाद तेली,गंगाधर व्हसकोटी, जयकुमार मुन्नोळी यांनी मनोगत व्यक्त केले.बैठकीस जितेंद्र शिंदे, दशरथ कुपेकर,नितीन पाटील, आप्पासाहेब गडकरी, शंकर कांबळे, आप्पासाहेब पाटील, सर्जेराव कदम, राजू कांबळे,बशीर पठाण, प्रकाश पट्टणशेट्टी, तानाजी कांबळे, सतीश थोरात ,शुक्राचार्य चोथे, अंकुश रणदिवे, ज्ञानप्रकाश रेडेकर, मारुती पाटील, दीपक पुजारी,किरण शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.विकी कोणकेरी यांनी आभार मानले.यांनी मागितली उमेदवारी..!'गोकुळ'मध्ये सौ सुरेखा बाबुराव चौगुले, महाबळेश्वर चौगुले, गंगाधर व्हसकोटी यांनी तर जिल्हा बँकेत विद्यमान संचालक संतोष पाटील - कडलगेकर,रामाप्पा करिगार, उदय जोशी यांच्यासाठी उमेदवारी मागण्याचा निर्णय यावेळी एकमताने झाला.
गोकुळ,केडीसी बँकेची निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 09:39 IST
Gokul Milk Gadhinglaj kolhapur- सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गोकुळ आणि केडीसी बँकेची निवडणूक ताकदीने लढवली जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी चंदगड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रामाप्पा करिगार यांनी केली.
गोकुळ,केडीसी बँकेची निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढवणार
ठळक मुद्देसर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊ : रामाप्पा करिगारगडहिंग्लजला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक