‘गोकुळ’ देशात नंबर वन होईल : शिवतारे
By Admin | Updated: January 19, 2015 00:27 IST2015-01-19T00:17:41+5:302015-01-19T00:27:59+5:30
मुंबईतील वितरणाचा वाढता व्याप लक्षात घेता भविष्यात ‘गोकुळ’ विस्तारीकरणासाठी नवीन जागा खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे,

‘गोकुळ’ देशात नंबर वन होईल : शिवतारे
कोल्हापूर : ‘गोकुळ’ने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत गुणवत्तेच्या बळावर सहकारात एक दबदबा निर्माण केला आहे. संघाचे काम पाहता नजीकच्या काळात ‘गोकुळ’ देशात नंबर वन होईल, असा विश्वास जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. ‘गोकुळ’च्या नवी मुंबई येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. विजय शिवतारे हे ‘गोकुळ’चे मुंबईतील वितरक आहेत. त्यामुळे मुंबई वितरकांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार उल्हास पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते करण्यात आला.
‘गोकुळ’च्या प्रगतीचा आढावा घेत अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दैनंदिन कामकाजातील अडचणी मंत्र्यांच्या समोर मांडल्या. मुंबईतील वितरणाचा वाढता व्याप लक्षात घेता भविष्यात ‘गोकुळ’ विस्तारीकरणासाठी नवीन जागा खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार उल्हास पाटील, स्वामी, एन. टी. पाटील, शिवकुमार यांनी मनोगत व्यक्त केले.