शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’मध्ये हातकणंगले-शिरोळला वाली कोण?

By admin | Updated: May 6, 2015 00:16 IST

दोन्ही तालुक्यांना संधी नाही : वीस वर्षांपासून प्रतिनिधी न देण्याची खेळी यशस्वी झाल्याची चर्चा

दत्ता बिडकर - हातकणंगले -मोठ्या प्रमाणात झालेल्या क्रॉस व्होटिंगचा फटका हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याला बसल्यामुळे ‘गोकुळ’मध्ये हातकणंगले-शिरोळ तालुका पोरका झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील यांचा पराभव नेतेमंडळींच्या गेम राजकारणाचा फटका असून, क्रॉस व्होटिंगमुळे हातकणंगले-शिरोळचा गेल्या वीस वर्षांत प्रतिनिधी नसण्याचा खेळ यशस्वी झाल्याची चर्चा आहे.हातकणंगले तालुक्यात ७६ आणि शिरोळ तालुक्यात १२९ मतदार असूनही जिल्ह्याच्या पश्चिम भागातील मोठ्या मतदार संस्थेच्या जोरावर या दोन तालुक्यांतील उमेदवाराला कोंडीत पकडत पराभूत करण्याचे राजकारण ‘गोकुळ’च्या निवडणुकीत यशस्वी झाल्याची चर्चा दोन तालुक्यांत सुरू आहे. ‘गोकुळ’चे नेतृत्व आमदार महादेवराव महाडिक करीत आहेत. हातकणंगले हा त्यांचा होम ग्राऊंड तालुका असल्यामुळे गेली दहा-पंधरा वर्षे शिरोळ तालुक्याला प्रतिनिधित्व दिले जात होते. यावेळी हातकणंगले तालुक्याला संधी मिळेल, अशी परिस्थिती होती. मात्र, सत्ताधारी गटाकडून अर्ज दाखल केलेले विश्वासराव इंगवले यांचा अर्जच दुधाची अट पूर्ण करीत नसल्याच्या कारणास्तव छाननीत बाद ठरवण्यात आला. अखेर गोकुळ दूध संघात सुपरवायजर असलेले विश्वासराव इंगवले ‘इतके अज्ञानी कसे?’, असा प्रश्न मतदारांना पडला असताना उमेदवारीमध्येच नेतेमंडळींनी गेम करून विश्वासराव इंगवले यांचा गेम केल्याची चर्चा सभासदांमध्ये होती. ‘गोकुळ’च्या राजकारणात दोन तालुके पोरके झाल्याचे चित्र स्पष्ट आहे. दिलीप पाटील हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नातेवाईक असल्याने ते चेअरमन होत असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे दिलीप पाटील यांना नाईलाजास्तव चेअरमन करावे लागल्याचे अन्य नेतेमंडळींना सलत होते. म्हणूनच नेतेमंडळींनी दिलीप पाटील यांचा गेम केल्याची चर्चा असून, दिलीप पाटील यांचा पराभव झाल्यामुळे दोन्ही तालुक्याला यापुढे वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. करवीर, राधानगरी, कागल, भुदरगडचे सभासद जादा असल्यामुळे त्यांचा वरचष्मा राहिला. मात्र, हातकणंगले ७३ व शिरोळ १२९ असे २०५ सभासद ठराव असताना दोन तालुक्यांचा एक प्रतिनिधी असताना विद्यमान चेअरमन दिलीप पाटील यांचा पराभव दोन्ही तालुक्यांच्या जिव्हारी लागला आहे.